Tips & Tricks : बाहेर गेल्यावर या ठिकाणी फोन चुकूनही करू नका चार्ज, हॅक झालाच समजा..

सायबर सुरक्षा तज्ञांच्या सांगण्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी असलेला चार्जिंग पॉईंट वापरल्याने तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते किंवा मालवेअर बसवता येऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज करणे टाळावे.

| Updated on: Oct 17, 2025 | 11:58 AM
1 / 7
आपल्या सर्वांच्या बाबतीत असे अनेकदा घडते की आपण घराबाहेर असताना आपल्या फोनची बॅटरी कमी होते. अशा परिस्थितीत, सार्वजनिक ठिकाणी आपण चार्जिंग पॉईंट शोधतो. पण अशा ठिकाणी फोन चार्ज करणं हे तुमच्या फोनला आणि तुमच्या वैयक्तिक माहितीला धोका निर्माण करू शकतं, हे  तुम्हाला माहित आहे का ? सायबर सुरक्षा तज्ञांच्या सांगण्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी असलेला चार्जिंग पॉईंट वापरल्याने तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते किंवा मालवेअर बसवता येऊ शकते.  सार्वजनिक यूएसबी पोर्ट कुठे वापरणे टाळावे ते जाणून घेऊ.

2 / 7
 HGD India च्या एका अहवालात असे म्हटले आहे की विमानतळांवर सर्वत्र चार्जिंग पॉइंट्स असतात, प्रवासादरम्यान तुमच्या फोनची बॅटरी कमी झाल्यावर त्यांचा वापर करणे सोपे आहे. पण सायबर सुरक्षा तज्ञ जेसन ग्लासबर्ग यांच्या सांगण्यानुसार, अशा ठिकाणी लोक घाईत असतात आणि त्यामुळे ते त्यांच्या उपकरणांच्या सुरक्षिततेबद्दल विचार करत नाहीत. जर तुम्ही विमानतळावर चार्जिंग पॉईंट वापरत असाल तर हॅकर्स तुमच्या फोनमधून डेटा चोरू शकतात.

3 / 7
रेल्वे स्टेशन किंवा बस टर्मिनल: रेल्वे स्टेशन किंवा बस टर्मिनलवर मोफत चार्जिंग स्टेशन पाहून आपण आपला फोन चार्ज करायला लावतो. पण सायबरसुरक्षा तज्ञ जॅक व्होंडर हाइड स्पष्ट करतात की हॅकर्स तुमचा फोन चार्ज करण्यासाठी या स्टेशनवर यूएसबी पोर्ट सेट करू शकतात, एवढंच नव्हे तर ते तुमचा डेटा देखील चोरू शकतात. तुमची कन्टॅक्ट लिस्ट, मेसेज किंवा फोटो हॅकर्सच्या हाती लागू शकतात.

4 / 7
हॉटेल रूम : हॉटेलच्या खोलीत अलार्म घड्याळावर किंवा बेडसाईड टेबलवर यूएसबी पोर्ट असतात, पण हॅकर्स हे पोर्ट देखील हॅक करू शकतात. जर तुम्ही तुमचा फोन त्यात प्लग केला तर ते तुमच्या फोनमध्ये मालवेअर शिरू शकतो. किंवा तुमचा डेटा चोरा जाऊ शकतो.

5 / 7
रेंटल कार :  आजकाल, भाड्याच्या गाड्यांमध्ये यूएसबी पोर्ट देखील येतात, जे चार्जिंगसाठी सोयीस्कर वाटू शकतात. मात्र, सायबर सुरक्षा सल्लागार स्टेसी क्लेमेंट्स याबद्दल सांगतात की, हे पोर्ट वापरणे धोकादायक असू शकते. या पोर्टद्वारे हॅकर्स तुमच्या फोनमधील माहिती चोरू शकतात. तसेच, कारमध्ये तुमचा फोन चार्ज केल्याने बॅटरी खराब होऊ शकते.

6 / 7
मॉल: मॉलमध्ये खरेदी करताना तिथे तुमचा फोन चार्ज करण्यासाठी सार्वजनिक चार्जिंग पॉइंट्स वापरणे धोकादायक आहे. हे कियॉस्क तुमच्या फोनमधून संपर्क, ईमेल, संदेश, फोटो आणि अगदी पासवर्ड आणि बँक तपशील देखील चोरू शकतात.   काही प्रकरणांमध्ये, मालवेअरचाही धोका असतो.

7 / 7
कॉफी शॉप : कॉफी शॉप्समध्येही फोन चार्जिंगची सुविधा असते, परंतु हॅकर्स या ठिकाणी यूएसबी पोर्टमध्ये लपलेले डिव्हाइस स्थापित करू शकतात. हे डिव्हाइस तुमच्या फोनमध्ये मालवेअर इंजेक्ट करू शकतात, जे नंतर तुमची वैयक्तिक माहिती चोरू शकतात. त्यामुळ सार्वजनिक ठिकाणी तुमचा फोन चार्जिंगला लावणं टाळाच. घरातून निघतानाच तुमचा फोन नीट चार्ज करा.