
भगवान विष्णू हे जगाचे पालनकर्ते मानले जातात. ज्यांची उपासना, जप आणि उपवास इत्यादींसाठी एकादशीचे व्रत सर्वोत्तम मानले गेले आहे. आज भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी म्हणजेच अजा एकादशी आहे.

धार्मिक ग्रंथांमध्ये अजा एकादशीचे व्रत नियमानुसार पाळणे हे अश्वमेध यज्ञाप्रमाणे फलदायी मानले गेले आहे. भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आपण पूजा आणि उपवास इत्यादी दरम्यान काय करावे आणि काय करू नये हे आपण जाणून घेणार आहोत.

अजा एकादशीच्या दिवशी काळे कपडे घालू नयेत. शक्य असल्यास पिवळे कपडे परिधान करून भगवान विष्णूची पूजा करावी. तसेच पिवळी फुले, पिवळी फळे, पिवळी मिठाई पुजेसाठी घ्यायला हवी.

अजा एकादशीच्या व्रताचे पुण्यप्राप्ती होण्यासाठी माणसाने दिवसा झोपू नये, तर दिवसभरातील इतर कामे करताना मनाने भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करावा. पूजा करताना भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करावा.

अजा एकादशीच्या व्रतामध्ये तांदूळ अजिबात खाल्ले जात नाही. एकादशी व्रताच्या नियमांनुसार तांदळाचे सेवन एक दिवस आधी म्हणजे दशमीच्या दिवसापासून बंद करावे.