तुम्हालाही आहे का घाईघाईने जेवण्याची सवय ? सावध व्हा नाहीतर पडाल आजारी
तुम्हीही घाईघाईने अन्न खात असाल तर ही सवय आजच थांबवा. कारण पटापट खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्याबद्दल जाणून घेऊया..
Follow us
आजच्या बिझी लाईफस्टाइलमध्ये बहुतांश लोकांना शांतपणे बसून जेवायला वेळ नसतो. बऱ्याच लोकांना घाईघाईत जेवायची सवय लागते. ऑफिसची धांदल असो की कौटुंबिक जबाबदाऱ्या, पोटभर जेवायला वेळ मिळणे कठीण झाले आहे. ( Photos : Freepik)
पण घाईघाईत अन्न खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात हे तुम्हाला माहीत आहे का ? हो, हे खरं आहे. पटापट अन्न खाल्ल्याने पचनसंस्थेवर परिणाम होऊन पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. घाईत अन्नपदार्थ खाल्ल्याने कोणत्या आजारांचा धोका वाढतो, ते जाणून घेऊया.

जाडेपणा – जेव्हा आपण जलद खातो तेव्हा आपली पचनक्रिया मंदावते. त्यामुळे शरीरात चरबी जमा होऊ लागते आणि वजन वाढू लागते. जेव्हा आपण हळूहळू खातो तेव्हा पोट भरलेले वाटते आणि आपण जास्त खाणे टाळतो. जेव्हा आपण अन्न व्यवस्थित चावून खातो, तेव्हा ते योग्य प्रकारे पचते आणि मेटाबॉलिज्म देखील जलद राहते. त्यामुळे घाईघाईने खाणे टाळावे.
अन्न पचत नाही – जेव्हा आपण पटापट खातो तेव्हा आपल्याला अन्न नीट चावता येत नाही. चावल्याने पाचक एंझाइम लाळेमध्ये येतात जे पचनास मदत करतात. परंतु पटापट खाल्ल्यास ही एन्झाईम्स पुरेशा प्रमाणात तयार होत नाही. हळूहळू, चावून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.