
या डिजिटल युगात मनात प्रश्न आले रे आला की आपण गुगल करतो. गुगल बाबा त्याचे लाखो अंतरजाळासह पटकन उत्तर देतो. त्यातही अल्गोरिदमनुसार उत्तर पुढ्यात असतं.

वस्तू, ठिकाणं, सेलिब्रिटी,नोकरी, व्यवसाय, सामान्य ज्ञान आणिक काय काय आपण गुगलवर सर्च करतो. इतकंच सर्च करतो असं नाही, तर अनेक गोष्टी सर्च करू नये असे मन बजावत असतं ते तर आपण लवकर गुगल करतो.

गुगलवर काही शब्द शोधणं हे तुम्हाला अडचणीत आणू शकते. कारण या सर्वांचा रेकॉर्ड ठेवते. त्यामुळे तुम्ही गुगलवर काही वेडं वाकडं सर्च केलं आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी ते धोकादायक वाटलं तर मग ही हिस्ट्री तुमच्याविरोधातील सज्जड पुरावा ठरते.

एटीएम हँक,बनावट नोटा, मोबाईल हॅक ट्रीक्स, सोशल मीडिया हँडल्स हँक करणे असे काही प्रकार गुगल करायला गेलात तर तुमची तुरुंगवारी निश्चित आहे. त्याआधारे एखाद्या प्रकरणात तुम्ही अडकलात तर मग शिक्षेपासून वाचणे कठिण आहे.

कट्टा कुठे मिळतो, तो कसा चालवायचा, शस्त्रे, दारुगोळा कुठे मिळतो, कसा तयार करायचा, कुठून सहजतेने मिळवायचा या गोष्टी कुतुहलाने जरी शोधल्या तरी कायद्याचा बडगा उगारल्या जाईल. ही अति घाई, तुम्हाला संकटात नेल्याशिवाय राहणार नाही.

यासोबतच सातत्याने अश्लिल, आंबट कंटेंट शोधत असाल तर ते पण घातक ठरते. लहान मुलांशी संबंधीत पोर्गोग्राफी हा तर गंभीर अपराध आहे. त्यात तुम्ही अडकलात तर मग चक्की पिसिंग अँड पिसिंगच होईल.