

अनेकदा आपण आपल्या जोडीदाराला रागाच्या भरात काहीतरी बोलून जातो. नंतर आपल्याला त्याचा पश्चात्ताप होतो. असे होऊ नये म्हणून योग्य ती खरबदारी घेणे गरजेचे आहे. काही गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात.


नात्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एकमेकांनी एकमेकांसाठी केलेल्या कामाचा कधीच हिशोब ठेवू नये. तसेच हा हिशोब आलपल्या जोडीदाराला कधीच बोलून दाखवू नये. तसे केल्यास जोडीदाराला वाईट वाटू शकते आणि भविष्यात तुमच्या नात्याता मिठाचा खडा पडू शकतो.

आपल्या जोडीदाराला तू नको तिथे संवेदनशील होतो असे म्हणू नये. कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. त्या स्वभावाला समजून घेणे गरेजेचे असते. काही गोष्टी खटकत असतील तर त्या योग्य पद्धतीने सांगणे गरजेचे आहे. मात्र नको तिथे त्रागा केल्यास नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)