RCB Win IPL 2025: 18 वर्षांनी आयपीएल जिंकणाऱ्या RCB चा मालक कोण ? तुम्ही जो विचार करताय ते उत्तर..

RCB Win IPL 2025 : स्टार प्लेअर असलेल्या विराट कोहलीच्या आरसीबीने यावेळी चमत्कार करत 18 वर्षांनी पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. आरसीबीचे सर्व चाहते या विजयाचा आनंद साजरा करत आहेत.

| Updated on: Jun 04, 2025 | 12:20 PM
1 / 7
विविध रंग, जय -पराजय, लक्षात राहणाऱ्या खेळी दाखवून अखेर आयपीएल 2025 चा हा सीझन संपला आहे. या वर्षी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 18 वर्षांनी पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली. ( photos : Social Media)

2 / 7
फायनलमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जशी आरसीबीची लढत होती. दोन्ही संघ पहिल्यांदाच विजयी होत ट्रॉफी पटकावण्यासाठी प्रयत्न करत होते. बंगळुरूने पंजाबच्या टीमला 6 धावांनी हरवलं आणि ट्रॉफी जिंकत आनंद साजरा केला.

3 / 7
या आयपीएलमध्ये, खेळाडूंव्यतिरिक्त, संघाचे मालक देखील नेहमीप्रमाणे चर्चेत होते. मुंबई इंडियन्सच्या मालकण नीता अंबानी, हैदराबादची काव्या मारन, पंजाबची प्रीती झिंटा आणि कोलकात्याचा शाहरुख खान... हे सर्व लोक  आपल्या संघाला चिअर करताना स्टेडियममध्ये अनेक वेळा दिसले.

4 / 7
दरम्यान आरसीबीने आयपीएल जिंकल्यानंतर, आता सर्व चाहत्यांच्या आणि इतर क्रिकेट प्रेमींच्या मनात एक प्रश्न फिरतोय तो म्हणजे, की आरसीबीचा मालक कोण आहे? चला या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.

5 / 7
जेव्हा जेव्हा आरसीबीची चर्चा होते तेव्हा विजय मल्ल्याचे नाव सर्वांच्या तोंडी येतं खरं पण, गेल्या अनेक वर्षांपासून मल्ल्या आरसीबीचे मालक नाहीत. युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड नावाच्या कंपनीकडे आरसीबीची मालकी आहे. ही एक मोठी मद्य उत्पादक कंपनी आहे.

6 / 7
युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडचे ​​चेअरमन महेंद्र कुमार शर्मा (MK Sharm) आहेत, म्हणजेच ते आरसीबीचे सध्याचे मालक आहेत. आरसीबीची एकूण निव्वळ संपत्ती या कंपनीच्या खात्यात जाते.

7 / 7
आरसीबीची मालकी असलेल्या कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी कधीही प्रसिद्धीच्या झोतात आले नसले तरी, यावेळी आरसीबीने आयपीएलचे विजेतेपद जिंकून कोट्यवधी रुपये त्यांच्या खिशात घातले आहेत.