Stress: जास्त टेन्शन घेतल्याने केस खरंच गळतात का? तज्ज्ञांनी दिले उत्तर

बरेच लोक कामाच्या किंवा कौटुंबिक तणावामुळे त्रस्त आहेत. अशाच ताण तणावाचा परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत असतो. आपल्या त्वचेवर आणि केसांवरही त्याचा परिणाम होतो.

| Updated on: Sep 14, 2025 | 10:55 PM
1 / 6
तुमच्यापैकी अनेकांचे केस गळत असतील. यामागे अनुवांशिक आणि हार्मोनल बदलांसह अनेक कारणे असू शकतात. यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे ताण-तणाव. याचा तुमच्या केसांवर परिणाम होतो. याबद्दल तज्ज्ञांचे काय मत आहे ते जाणून घेऊयात. (Photo Credit : Getty Images)

2 / 6
आरएमएल हॉस्पिटलमधील त्वचारोग विभागाचे डॉ. भावुक धीर यांनी म्हटले की, बराच काळ ताणतणावात राहिल्याने केस गळण्याची समस्या जाणवते. त्यामुळे ताणतणावाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तणावामुळे व्यक्तीच्या शरीरात बदल दिसून येतात, ज्यामुळे केस गळू शकतात.

3 / 6
डॉक्टरांनी म्हटले की, 'जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती तणावाखाली असते तेव्हा त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. याचा फटका केसांच्या आरोग्याला बसतो. ज्यामुळे केस गळू शकतात.

4 / 6
तणाव नियंत्रणात ठेवणे हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासह त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.  ताण नियंत्रित करण्यासाठी, तु्म्ही ध्यान करू शकता, यामुळे मन शांत होईल आणि लक्ष केंद्रित होईल.

5 / 6
ताण कमी करण्यासाठी तुम्हाला त्रास देणारी गोष्ट डायरीमध्ये लिहा. यामुळे तुम्हाला ताण कमी करण्यास मदत होऊ शकते. तसेच तुम्ही तुमच्या मनातील गोष्ट तुमच्या मित्रांसोबत किंवा जवळच्या लोकांसोबत शेअर करू शकता यामुळे ताण कमी होतो.

6 / 6
व्यायाम केल्यानेही तणाव कमी होतो. तुम्ही व्यायाम करता तेव्हा ते शरीरात आनंदी हार्मोन्स एंडोर्फिन सोडते. हा हार्मोन मूड स्थिर ठेवण्यास आणि तो सुधारण्यास मदत करतो. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.