तुमचा कुत्रा आजारी आहे की नाही? फक्त एका सेकंदात ओळखा, कोणत्या सवयी काय सांगतात?

जर तुमचा कुत्रा अचानक चिडचिड करत असेल, तुमच्यासोबत खेळायला किंवा तुम्हाला भेटायला येत नसेल, तो सतत एकांतात राहत असेल तर हे स्पष्ट लक्षण आहे की तो आजारी आहे.

Updated on: Dec 01, 2025 | 8:56 PM
1 / 8
राज्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. माणसांप्रमाणेच पाळीव प्राण्यांनाही या बदलांना तोंड द्यावे लागते. या ऋतुत कुत्र्‍याचे पालन करणाऱ्यांना त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात लक्षणीय घट होताना पाहायला मिळते.

2 / 8
हिवाळ्यात अन्नाचे प्रमाण कमी होते. पण जेव्हा तुमचा कुत्रा खाणे-पिणे पूर्णपणे थांबवतो, खूप सुस्त होतो आणि सतत डोके खाली ठेवून झोपतो तेव्हा काहीतरी गंभीर समस्या आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे. आज आपण या बातमीद्वारे कुत्र्याची काही अशी महत्त्वाची लक्षणे शेअर करत आहोत, ज्याच्या आधारे तुम्ही त्याला पशुवैद्यकाची आवश्यकता आहे की नाही हे जाणून घेऊ शकता.

3 / 8
कुत्रा आजारी आहे की नाही हे ओळखण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे त्याच्या हालचाली. जर तुमचा कुत्रा अचानक चिडचिड करत असेल, तुमच्यासोबत खेळायला किंवा तुम्हाला भेटायला येत नसेल, तो सतत एकांतात राहत असेल तर हे स्पष्ट लक्षण आहे की तो आजारी आहे.

4 / 8
जर तुमच्या कुत्र्याला खोकला, शिंका येत असतील. तो काहीही खात-पित नसेल तर त्याच्याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. ही लक्षणे ताप किंवा संसर्ग दर्शवू शकतात. कुत्र्याचे शरीर त्याच्याबद्दल बरेच काही सांगते. त्याचे डोळे, नाक, कान यांची स्थिती, शरीराचा वास, शेपटीचे हालचाल किंवा बसण्याची स्थिती यात जर तुम्हाला काही बदल जाणवला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

5 / 8
कुत्र्याच्या आरोग्याची तपासणी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याच्या हिरड्यांकडे पाहणे. जर तुमच्या कुत्र्याच्या हिरड्यांचा रंग गुलाबी असेल, तर तो निरोगी आहे असे समजावे. जर तुम्हाला त्याच्या हिरड्यांचा रंग पिवळा, पांढरा, निळा किंवा राखाडी दिसला, तर हे गंभीर आजाराचे मोठे लक्षण आहे.

6 / 8
जर तुमचा कुत्रा लघवी करणे थांबवत असेल किंवा जास्त प्रमाणात लघवी करत असेल तर या दोन्ही चिंताजनक परिस्थिती आहेत. हे मूत्रपिंड किंवा इतर अंतर्गत समस्येचे लक्षण असू शकते. त्यामुळे ताबडतोब तुमच्या पशुवैद्यांशी संपर्क साधा.

7 / 8
कुत्र्यांना लाळ येणे स्वाभाविक आहे. पण जर तुमच्या कुत्र्याला अति प्रमाणात लाळ येत असेल आणि त्याच वेळी तो धापा टाकत असेल, तर हे चांगले लक्षण नाही. हे गंभीर संसर्ग किंवा त्याला खूप वेदना होत असल्याचे चिन्ह असू शकते.

8 / 8
एक निरोगी कुत्रा त्याच्या सभोवतालच्या तापमानाशी सहज जुळवून घेतो. जर तुमचा कुत्रा सतत शरीराची जागा बदलत असेल, सतत खाजवत असेल किंवा सतत उबदार जागा शोधत असेल, तर याचा अर्थ तो अस्वस्थ आहे किंवा त्याला बरं नाही.