डोंबिवलीत रातोरात रस्ता झाला गुलाबी, कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का

डोंबिवली एमआयडीसीतील रस्ता गुलाबी होण्याच्या गंभीर प्रदूषण प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) एमआयडीसी आणि संबंधित ठेकेदाराला 'कारणे दाखवा' नोटीस बजावली असून, अहवालानंतर कारवाईचा इशारा दिला आहे.

| Updated on: Dec 14, 2025 | 1:55 PM
1 / 6
डोंबिवली एमआयडीसी परिसरात काल गटारातील रासायनिक गाळाच्या ढिगावर पाणी मारल्यामुळे रस्ता अचानक गुलाबी झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. या गंभीर प्रदूषण प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आहे.

2 / 6
याप्रकरणी एमआयडीसी (MIDC) आणि संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसच्या अहवालानंतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही मंडळाने दिला आहे.

3 / 6
एमआयडीसीतील मालवण किनारा हॉटेलसमोरील रस्ता शनिवारी सकाळी गुलाबी रंगाचा झालेला पाहायला मिळाले. यापूर्वी हिरवा पाऊस, लाल रस्ते आणि रंगीत नाले अशा अनेक प्रदूषण घटनांसाठी चर्चेत असलेल्या डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा एकदा हा नवा प्रकार समोर आला आहे.

4 / 6
प्राथमिक तपासानुसार, गटारातील रासायनिक गाळ रस्त्याच्या कडेला जमा झाला होता. त्यावर ही रसायने रस्त्यावर पसरून रस्ता गुलाबी झाला. एमआयडीसीतील कंपनीच्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

5 / 6
याप्रकरणी रहिवासी आणि राजकीय नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान नागरिकांच्या तक्रारी आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने पाऊले उचलली आहेत.

6 / 6
मंडळाने एमआयडीसी व संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून अहवाल मागितला आहे. या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच, परिसरातील रस्त्यावर जमा झालेले रासायनिक गाळाचे ढीग त्वरित उचलण्याचे निर्देशही मंडळाने दिले आहेत.