Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा मोठा निर्णय, ज्या देशावर हल्ला केला त्याच…एकाच झटक्यात जगाचं टेन्शन संपलं!

इराण-इस्रायल युद्धामुळे जगापुढे तेलसंकट निर्माण झाले आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने उर्जासंकटही डोके वर काढत आहे. असे असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

| Updated on: Mar 18, 2026 | 9:29 PM
1 / 5
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगापुढे नवे संकट उभे ठाकले आहे. कच्च्या तेलाची किंमत अव्वाच्या सव्वा वाढली आहे. दुसरीकडे इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने जगाचा कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.

2 / 5
त्याचाच परिणाम म्हणून भारत, पाकिस्तानसह जगभरातील अनेक देशांमध्ये महागाई वाढत आहे. तेलाच्या, पीएनजी, सीएनजीच्या किमतीतही मोठी वाढ होताना दिसत आहे. याच कारणामुळे हे युद्ध लवकरात लवकर थांबवावे, असे आवाहन अनेक देशांकडून केले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर यामुळेच एका प्रकारे दबाव निर्माण होत आहे.

3 / 5
दरम्यान, जगातील तेलपुरवठा साखळी कायम राहावी, यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी व्हेनेझुएला या देशावरील तेलाच्या व्यापारविषयक सर्व निर्बंध हटवले आहेत. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने तसा निर्णय घेतला आहे.

4 / 5
ट्रेझरी विभागाने काही अटी-शर्तींसह व्हेनेझुएलातील तेल आणि गॅसची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवरील प्रतिबंध हटवले आहे. या निर्णयानंतर आता अमेरिकेच्या कंपन्या व्हेनेझुएलातील तेल कंपन्यांसोबत व्यापार, व्यवहार करू शकणार आहेत.

5 / 5
इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध सध्यातरी थांबण्याची शक्यता आहे. या युद्धात अमेरिकादेखील गुंतलेली आहे. त्यामुळेच तेल पुरवठा विस्कळीत झाल्याने अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे अमेरिकेवर असलेल्या दबावाचा प्रतिक असल्याचेही बोलले जात आहे.

Follow Us