Donald Trump : निवडणुकीतील पराभवानंतर आता कसं वाटतंय? पत्रकाराचा प्रश्न ऐकताच डोनाल्ड ट्रम्प सटकले!

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीनंतर पत्रकारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना काही थेट प्रश्न विचारले. निवडणुकीतील पराभवाबद्दल विचारताच ट्रम्प उत्तर न देता पुढे निघून गेले. नेमंक काय घडलं?

| Updated on: Nov 08, 2026 | 11:17 PM
1 / 5
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला मोठा फटका बसला आहे. यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळाले.

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला मोठा फटका बसला आहे. यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळाले.

2 / 5

व्हाइट हाऊसबाहेर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांना चीफ ऑफ स्टाफ सूसी वाइल्स यांना पदावरून हटवण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यांच्या जागी स्टीफन मिलर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय त्यांनी का घेतला, अशी विचारणा झाली.

3 / 5

याचवेळी एका पत्रकाराने ट्रम्प यांना, निवडणुकीतील पराभवानंतर तुम्हाला कसे वाटत आहे, असा थेट प्रश्न विचारला. मात्र, ट्रम्प यांनी या प्रश्नाचे कोणतेही उत्तर दिले नाही.

4 / 5

पत्रकाराचा प्रश्न ऐकल्यानंतर ट्रम्प पुढे चालत निघून गेले. त्यांनी मागे वळूनही पाहिले नाही. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

5 / 5

सूसी वाइल्स यांना हटवण्याबाबत बोलताना ट्रम्प यांनी आपल्याला बदल करायचा होता, असे सांगितले. आयुष्यात कधीकधी काही निर्णय घ्यावे लागतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us