Shefali Shah : मुलं जन्माला घालण्यापेक्षा कुत्रे पाळा, प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली शाहचं धक्कादायक वक्तव्य

Shefali Shah : दमदार अभिनय, बोलके डोळे, मोहक सौंदर्य म्हणजे शेफाली शाह. बॉलिवूडमध्ये आपल्या कामाच्या बळावर शेफालीने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने एका मुलाखतीत घटस्फोट, ब्रेकअप आणि नातं यावर भाष्य केलं आहे.

| Updated on: May 16, 2026 | 8:20 AM
1 / 5
सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात घटस्फोट, ब्रेकअप आणि नात्यात फसवणूक अशा गोष्टी सतत कानावर पडत असतात. त्यावर अभिनेत्री शेफाली शाहने आपलं मत मांडलं आहे. एका मुलाखतीत तिने आयुष्याशी संबंधित निर्णय घेण्यात घाई करु नका असा युवा वर्गाला सल्ला दिला.

2 / 5
 कमी वयात लग्न करणं योग्य नाही. कारण त्यावेळी माणूसच स्वत:ला व्यवस्थित समजून घेत नसतो. जो पर्यंत तुम्हाला स्वत:ला हे माहित नाहीय की, तुम्हाला काय आवडतं आणि काय नाही, तो पर्यंत लग्नासारखा मोठा निर्णय घेऊ नका. आधी लोकांना ओळखा. आयुष्य समजून घ्या आणि मग निर्णय घ्या असं लिली सिंह सोबत बोलताना शेफाली शाह म्हणाली.

3 / 5
लग्न फक्त एक नातं नाही, ती एक मोठी जबाबदारी आहे. जर, एखाद्याचा लग्न या संस्थेवर विश्वास नसेल, तर समाजाच्या दबावाखाली लग्न करु नये. नातं सुरु करण्याआधी माणसाने भावनिक दृष्ट्‍या स्वत:ला परिपक्व बनवलं पाहिजे असं शेफालीचं मत आहे.

4 / 5
शेफालीशी बोलता, बोलता लिली सिंह बोलली की, मी 37 वर्षांची आहे, अजून लग्न केलेलं नाही. त्यावर शेफाली हसत, हसत तिला बोलली की, "मुलं असण्यापेक्षा कुत्रे पाळा. कुत्रा माणसाच्या आयुष्यात खरं आणि कुठल्याही अपेक्षेशिवाय प्रेम देतो. यावर मी ट्रोल होणार हे मला माहितीय"

5 / 5
शेफाली शाहच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तिचं पहिलं लग्न अभिनेता हर्ष छाया सोबत झालं होतं. काही काळानंतर दोघे वेगळे झाले. त्यानंतर 2000 साली तिने फिल्ममेकर विपुल शाह सोबत लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत, आर्यमान आणि मौर्य.

Follow Us