
बऱ्याच लोकांना काहीही झाले तरीही लिंबू पाणी लागते. कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून पिण्याची जवळपास सर्वांनाच सवय आहे. मात्र, ही सवय काही लोकांच्या आरोग्यासाठी घातकही ठरू शकते.

तुम्ही देखील सतत कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून पित असाल तर आजच सावध व्हा. कारण यामुळे आरोग्याच्या असंख्य समस्या निर्माण होऊ शकतात.

अॅसिड रिफ्लक्स, गॅस्ट्र्रिटिस, अल्सर याची समस्या असणाऱ्या लोकांसाठी कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून पिणे धोकादायक ठरू शकते. यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात.

लिंबूमधील आम्ल हळूहळू दातांच्या मुलामा चढवणे खराब करू शकते, ज्यामुळे पोकळी निर्माण होण्याचा धोका वाढतो. यामुळे अतिरेक न केलेला बरा पडेल.

कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून सतत पिल्याने आतड्यांवरही त्याचा वाईट गंभीर परिणाम होऊ शकतो. दिवसातून एखाद्यावेळी हे पाणी पिणे ठीक आहे. मात्र, त्यापेक्षा जास्त नकोच.