
हिवाळ्यात चहा आणि कॉफी पिण्यावर लोकांचा अधिक भर असतो. नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कॉफी पिली जाते. मात्र, ही सवय निरोगी आरोग्यासाठी नक्कीच घातक आहे.

कॉफी असो किंवा चहा प्रमाणाबाहेर पिणे आरोग्यासाठी नक्कीच घातक आहे. बऱ्याच लोकांची सकाळ ही एक कप कॉफी आणि चहाने होते. सकाळी गरमा गरम चहा किंवा कॉफी पिण्याची मजा वेगळी असल्याचे अनेकजण सांगतात.

जर तुम्ही जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पित असाल तर हाडांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्हाला गुडघे दुखीची मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

हेच नाही तर यामुळे तुमची भूकही कमी होईल. निरोगी राहण्यासाठी हिवाळ्यातही जास्तीत जास्त फळे आणि हेल्दी गोष्टींचे सेवन करा. तुम्ही दररोजच्या आहारात फळांच्या ज्यूसचा समावेश करू शकता.

फी किंवा चहा दिवसातून एकदा नाही तर फार तर दोनदा घ्यावा, त्याशिवाय घेणे टाळा. जे लोक वाढलेले वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी चहा आणि कॉफी पिणे टाळावे.