
अनेक लोकांचा समज असतो की निरोगी राहायचे असेल तर जास्तीत जास्त पाणी प्यावे. पण जास्त पाणी पिणे शरीरासाठी धोकादायक ठरु शकते. त्यामुळे दिवसभरात किती पाणी प्यावे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी...

नुकताच समोर आलेल्य संशोधनात तंज्ञांनी चेतावनी दिली आहे की, ओव्हरहायड्रेशन (Overhydration), म्हणजे गरजेपेक्षा जास्त पाणी पिण्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडवू शकते आणि गंभीर आरोग्य समस्यांना जन्म देऊ शकते.

कधीकधी गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने किडणीवर दाब वाढतो. कारण किडनीवर पाणी सतत फिल्टर करण्यासाठी जास्त दबाव टाकला जातो.

तसेच मेंदूवरही नकारात्मक परिणाम होतो. संशोधनात असे समोर आले आहे की जास्त पाणी प्यायल्यामुळे मेंदूच्या पेशींना सूज येते. त्यामुळे डोकदुखी वाढते तसेच सतत गोंधळलेली परिस्थिती निर्माण होते.

जास्त पाणी प्यायल्यामुळे इलेक्ट्रोलाइट असंतुलनामुळे रक्तदाब (Blood pressure) चढ-उतार (fluctuate) होऊ शकतो.

प्रत्येक व्यक्तीने साधारणता दिवसभरात 2.5 ते 3 लिटर पाणी पुरेसे मानले जाते. मात्र, जर तुम्हाला खूप घाम येत असेल, तर हे प्रमाण थोडे वाढू शकते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य प्रमाणाच पाणी प्यावे)