Drishyam 3 : ‘दृश्यम 3’ मध्ये मराठी अभिनेत्रीची दमदार भूमिका, BTS फोटो पोस्ट करत म्हणाली…, कोण आहे ‘ती’?
Drishyam 3 : अभिनेता अजय देवगण स्टारर 'दृश्यम 3' सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. सिनेमातील प्रत्येक भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं असून, काही मराठी सेलिब्रिटींनी देखील सिनेमात दमदार भूमिका साकारली आहे.

'दृश्यम 3 ' सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री तब्बू आणि श्रिया सरण यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तर एका मराठी अभिनेत्री देखील सिनेमात दमदार भूमिकेत झळकली आहे.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मराठमोळी अभिनेत्री नेहा जोशी आहे. नेहा हिने 'दृश्यम 2' मध्ये देखील महत्त्वाची भू्मिका साकारली होती. आता तिसऱ्या भागात देखील ती झळकली आहे.
'दृश्यम 3' सिनेमात नेहा हिला अजय देवगण, प्रकाश राज, जयदीप अहलावत, तब्बू यांच्यासोबत स्क्रिन शेअर कण्याची संधी मिळाली आहे. नेहा हिने सिनेमातील तिच्या भूमिकेचा एक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सिनेमात नेहा हिने एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. जेनी थॉमस असं तिच्या भूमिकेचं नाव आहे. नेहा हिने पोलिसांच्या गणवेशात फोटो पोस्ट केला आहे. शिवाय लक्षवेधी असं कॅप्शन देखील लिहिलं आहे.
फोटो पोस्ट करत नेहा म्हणते, 'असिस्टंट सब इन्स्पेक्टर जेनी थॉमस रिपोर्टिंग..., 'दृश्यम 3'मध्ये पुन्हा एकदा या दिग्गज कलाकारांसोबत काम करताना शिकण्याचा एक अतिशय चांगला अनुभव मिळाला...', सध्या नेहा हिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.