दर महिना होईल 17000 रुपयांची कमाई, ही सरकारी योजना आहे लयभारी

आजच्या धावपळीच्या जीवनात बचतीचा मंत्र महत्वाचा आहे. जर तुम्ही सरकारी योजनांमध्ये पैसा गुंतवला तर तुम्हाला शेअर बाजारातील चढ-उताराचे धोके टाळून निश्चित उत्पन्न हाती पडते. अशाच एक महिना 17 हजार रुपयांची कमाई देणाऱ्या योजनेची माहिती घेऊयात..

| Updated on: Jun 06, 2026 | 3:56 PM
1 / 6
1 - ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार अनेक योजना चालवते. मात्र, छोट्या बचत योजना सर्वाधिक लोकप्रिय आहेत.यापैकी एक सिनियर सिटीझन सेव्हींग स्कीम (SCSS) आहे. निवृत्तीनंतर रेग्यूलर इन्कम मिळवण्यासाठी ही योजना चांगली आहे.

1 - ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार अनेक योजना चालवते. मात्र, छोट्या बचत योजना सर्वाधिक लोकप्रिय आहेत.यापैकी एक सिनियर सिटीझन सेव्हींग स्कीम (SCSS) आहे. निवृत्तीनंतर रेग्यूलर इन्कम मिळवण्यासाठी ही योजना चांगली आहे.

2 / 6

2 - ही योजना पोस्‍ट ऑफिस अंतर्गत संचालित केली जाते. यात शेअर बाजाराच्या चढ उताराची कोणतीही रिस्क नसते. तुम्हाला खात्रीशीर व्याज मिळते आणि वेळोवेळी पैसे खात्यात जमा होतात. तसेच तुम्ही करसवलतीचा देखील लाभ घेऊ शकतो.

3 / 6

3 - एक व्यक्ती या योजनेत कमाल ३० लाख रुपयांपर्यंत पैसे लावू शकतो. म्हणजे पती आणि पत्नी मिळून ६० लाख रुपये गुंतवू शकता. जर तुम्ही या स्कीममध्ये जोडीदारासोबत मिळून २५ लाख रुपये गुंतवले असतील तर तर तीन महिन्याला तुम्हाला तगडे व्याज मिळेल. आता पाहूयात महिना किती कमाई होईल.

4 / 6

4 - क्लिअर टॅक्‍सच्या कॅलक्युलेशन नुसार, जर तुम्ही या योजनेत २५ लाख रुपये लावाल तर ८.२ टक्के व्याजाच्या हिशेबाने तुम्हाला मोठी रक्कम व्याजाच्या रुपात मिळले. २५ लाखावर वर्षभरात २.०५ लाख रुपयाचे व्याज मिळेल. तर तीन महिन्याला ५१,२५० रुपये खात्यात जमा होतील.

5 / 6

5 - एका महिन्याच्या हिशेबाने गणती केली तर दर महिन्याला सरासरी १७,०८३ रुपयांची कमाई होईल आणि ५ वर्षात एकूण १०.२५ लाख रुपयांचे व्याज मिळेल. मॅच्युरिटी झाल्यावर २५ लाख रुपयांच्या जमा मुद्दल देखील परत मिळेल. म्हणजेच पाच वर्षात एकूण ३५.२५ लाख रुपये मिळू शकतील.

6 / 6

6 - जुनी टॅक्स व्यवस्था निवडणाऱ्यांना SCSS योजनेत गुंतवणूकीवर कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांचा कर सवलत मिळू शकते. जर SCSS आणि त्याच बँक वा पोस्ट ऑफीसमधील उपलब्ध दुसऱ्या बचत योजनातून मिळणारे एकूण व्याज एका वर्षात ५०,००० हजार रुपयांहून जास्त झाले तर TDS कापला जाऊ शकतो. जर तुम्ही पॅन दिला तर १० टक्के टीडीएस कापला जाईल आणि जर पॅन दिला नाही तर २० टक्के टीडीएस कापला जाईल.

Follow Us