
शेंगदाणे आणि गुळाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य... सोललेले शेंगदाणे – १ कप, गूळ अंदाजे 120–130 ग्रॅम, तूप – १ चमचा, वेलची पूड – ¼ चमचा... हे साहित्य बाजारात सहज उपलब्ध असतात.

कढई गरम करून मध्यम आचेवर शेंगदाणे छान खमंग भाजून घ्या. थंड झाल्यावर त्यांच्या साली काढून टाका. शेंगदाणे हाताने थोडेसे मोडून किंवा जाडसर कुटून ठेवा... पूर्ण बारीक शेंगगाणे करु नाक...

त्यानंतर गूळचा पाक तयार करुन घ्या. कढईत 1 चमचा तूप टाकून गूळ घाला. गूळ मंद आचेवर हलवत वितळू द्या. एकसारखा झाल्यावर पाकाची चाचणी करा.

गुळाचा पाक तयार झाल्यावर त्यात भाजलेले शेंगदाणे आणि वेलची पूड घाला.सर्व मिश्रण नीट एकजीव होईपर्यंत मिसळा. त्यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण गरम–गरम असतानाच छोटे–छोटे लाडू वळून घ्या. मिश्रण थंड झाले तर कठीण होते, त्यामुळे हातावर थोडे तूप लावून पटकन लाडू वळा.

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. पाक जास्त झाल्यास लाडू कडक होतात; खूप कमी झाल्यास मऊ पडतात. शेंगदाण्यांच्या जागी तीळ किंवा दोन्ही मिसळूनही लाडू तयार करता येतात.