हे 5 पदार्थ करतील तुमचा तणाव कमी!

स्ट्रेस असेल तर आपल्याला गोड खावं असं वाटतं. असे अनेक पदार्थ आहेत ज्यामुळे आपण ताणतणावापासून दूर राहू शकतो, तणाव कमी होऊ शकतो. आरोग्यतज्ञ सुद्धा हे उपाय आवर्जून सांगतात. हे आहेत ५ पदार्थ जे स्ट्रेस कमी करू शकतात. चला बघुयात...

| Updated on: Sep 12, 2023 | 7:27 PM
1 / 5
स्ट्रेस दूर करण्यासाठी ग्रीन टी हा सोपा उपाय आहे. ताणतणाव दूर करायचा असेल तर ग्रीन टी प्या. ग्रीन टी मध्ये कॅफिन असतं आणि कॅफिन तणावाला दूर करतं. आपण काय खातो-पितो याला फार महत्त्व आहे. ग्रीन टी स्ट्रेसमध्ये खूप फायदेशीर असते.  ग्रीन टीमध्ये L-theanine (एल-थियानिन) हे अमिनो अॅसिड असते ज्याने डोकं शांत होतं.

2 / 5
डार्क चॉकलेट केवळ चवीलाच चांगले नसतात तर त्याचे अनेक फायदे असतात. तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण दुःखात असलो किंवा आपण स्ट्रेस मध्ये असलो की आपल्याला गोड खायची, चॉकलेट खायची इच्छा होते. डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात जे मूड चांगला करतात. आरोग्यतज्ञ सुद्धा स्ट्रेस दूर करण्यासाठी डार्क चॉकलेट खाण्याचा सल्ला देतात.

3 / 5
बेरी: स्ट्रेस दूर करण्यासाठी बेरी खाणे हा सुद्धा उत्तम पर्याय आहे. बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स जास्त असतात. ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी किंवा रास्पबेरी हे असं सतत खात राहिलं की तणाव दूर होतो, तणावाची पातळी कमी होते. बेरी स्मूदी बनवून पण तुम्ही पिऊ शकता.

4 / 5
पालेभाज्या: पालेभाज्या अनेकांना आवडत नाहीत. पण पालेभाज्या आरोग्याला किती महत्त्वाच्या आहेत हे आपल्याला वारंवार सांगितलं जातं. पालेभाज्यांमध्ये मॅग्नेशियम असतं. मॅग्नेशियम तणाव कमी करण्यास महत्त्वाची भूमिका बजावतं. पालेभाज्या नियमित खाल्ल्यास तुम्हाला याचा प्रभाव नक्की दिसून येईल.

5 / 5
दाणे: दाणे म्हणजे तुम्ही बदाम, अक्रोड आणि पिस्ता असे विविध प्रकार. हे तुम्ही काम करता-करता, चालता चालता तुम्ही खाऊ शकता. स्ट्रेस दूर करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. जर आपण तणावाशी झगडत असाल तर  बदाम, अक्रोड आणि पिस्तामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले आहे.