
सकाळी नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न अनेकांना पडतो. नाश्ता फक्त पोटभरण्यासाठीच नाही तर हेल्दी असणेही आवश्यक असते आणि दररोज तेच तेच खाऊन अनेकांना कंटाळाही येतो.

आजकाल जवळपास महिला नोकरी करतात. यामुळे सकाळच्या धावपळीत असा काही नाश्ता हवा असतो. जो लवकर होईल आणि हेल्दीही असेल.

बऱ्याच घरात नाश्त्यात अंडा ऑम्लेट बनवले जाते. कारण अंडा ऑम्लेट तयार करण्यासाठी फार काही वेळ लागत नाही शिवाय फटाफट तयार होते आणि हेल्दीही असते.

जर तुम्हाला हेल्दी अंडा ऑम्लेट पाहिजे असेल आणि सर्व घटक त्यामध्ये पाहिजे असतील तर सकाळीच्या नाश्त्यामध्ये अंडा ऑम्लेटमध्ये पालक मिक्स करा.

पालक मिक्स केल्याने ते अधिक फायदेशीर ठरते. शिवाय त्याने पोटही भरल्यासारखे वाटते. यामुळे शक्यतो पालक अंड्याचा दररोजच्या आहारात समावेश करा.