
तुम्ही लाल मांस आठवड्यात 1 ते 2 वेळा खाऊ शकता. एका वेळेस सुमारे 80 ते 100 ग्रॅम शिजवलेले लाल मांस पुरेसे मानले जाते.आठवड्याला एकूण प्रमाण 300 ते 350 ग्रॅमपेक्षा जास्त नसावे, कारण जास्त प्रमाणात लाल मांस खाल्ल्यास वाईट कोलेस्ट्रॉल वाढण्याचा, हृदयविकाराचा आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढू शकतो.

त्यामुळे लाल मांस मर्यादेत,कमी चरबीचे तुकडे निवडून आणि उकडणे किंवा कमी तेलात शिजवून खाणे आरोग्यासाठी अधिक योग्य ठरते.अमेरिकेच्या नव्या आहार मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अमेरिकेचे आरोग्य सचिव रॉबर्ट एफ.केनेडी ज्युनियर यांनी जाहीर केले.

आता तूप,बटर आणि फुल-फॅट दूध यांसारख्या सॅच्युरेटेड फॅटविरोधातील लढाई संपली आहे.नव्या आहार मार्गदर्शक तत्त्वांनुसार खरा धोका प्रोसेस्ड अन्नपदार्थ आणि जास्त साखर यांचा आहे, तर अंडी, लाल मांस आणि फुल-फॅट डेअरी यांना उच्च दर्जाच्या प्रथिनांचा चांगला स्रोत मानले गेले आहे.

फॅटी लिव्हरचे रुग्ण रेड मांस खाऊ शकतात,पण मर्यादित प्रमाणात.रेड मासामध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त असल्याने ते जास्त खाल्ल्यास लिव्हरवर ताण येतो आणि फॅटी लिव्हरची समस्या वाढू शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आठवड्यात 1 वेळा खाऊ शकता.

भारतीय आहारात रेड मांस आवश्यक नाही.भारतीय पद्धतीच्या आहारातून डाळी, कडधान्ये, दूध, दही, पनीर, अंडी, मासे, सोयाबीन,शेंगदाणे यांसारख्या पदार्थांमधून शरीराला लागणारी प्रथिने, लोह, व्हिटॅमिन आणि इतर पोषक घटक सहज मिळू शकतात.