हिवाळ्यात ‘हे’ कंदमूळ आरोग्यास लाभदायक, जाणून घ्या फायदे

हिवाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. अशात ऊर्जा देणाऱ्या पदार्थांची शारीराला गरज असते. हिवाळ्यात रताळी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, कारण ती व्हिटॅमिन ए, सी, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. तर रताळी खाल्याने आरोग्यास कोणते फायदे होतात जाणून घेऊ...

| Updated on: Nov 09, 2025 | 4:04 PM
1 / 5
रताळीमध्ये नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे थंड हवेत शरीराचं तापमान संतुलित ठेवण्यास आणि ऊर्जा टिकवण्यास मदत होते. रताळीमध्ये भरपूर फायबर असतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर ठेवते.

2 / 5
रताळीमध्ये व्हिटॅमिन A, C आणि बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात असतात. हे घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि संसर्गांपासून संरक्षण करतात. त्यामुळे हिवाळ्या रताळी खाणं फायदेशीर ठरतं.

3 / 5
व्हिटॅमिन A आणि C त्वचेला नैसर्गिक चमक देतात आणि कोरडी त्वचा टाळतात. हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यासाठी हे मदत करतात.

4 / 5
रताळीमध्ये पोटॅशियम भरपूर असतं, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात आणि हृदयाच्या आरोग्यास मदत करतं. डायबेटीस असणाऱ्यांसाठीही रताळी फायदेशीर आहे. रताळीचं ग्लायसेमिक इंडेक्स तुलनेने कमी असल्यामुळे, मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास ते रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढवत नाही.

5 / 5
भाजलेली किंवा उकडलेली रताळी आरोग्यास लाभदायक ठरतात.  रताळ्याची खीर किंवा हलवा देखील तुम्ही करु शकता. पण त्यामध्ये साखरेचं प्रमाण मर्यादित ठेवा... रताळ्याचे चिप्स देखील खाऊ शकता...  सूप किंवा सलाडमध्ये रताळीचा समावेश करा.