तुमच्या किचनमध्ये झुरळं आहेत? एका मिनिटात जातील पळून, उपाय काय?

लेखात घरातील झुरळांच्या समस्या आणि त्यावर मात करण्यासाठी सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय सांगण्यात आले आहेत. बेकिंग सोडा, व्हिनेगर, लिंबू, तमालपत्रे, साबण आणि कांदा-बोरॅक्ससारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून झुरळांना नियंत्रणात ठेवता येते. यासोबतच, घराची स्वच्छता आणि ओलावा नियंत्रण राखणे देखील महत्त्वाचे आहे.

| Updated on: Jun 11, 2025 | 6:43 PM
1 / 11
हल्ली अनेक घरांमध्ये, किचनमध्ये मोठ्या प्रमाणात झुरळांचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. घरात झुरळ असणे हे केवळ अस्वच्छताच दर्शवत नाही तर ते आरोग्यासाठीही हानिकारक ठरु शकते.

2 / 11
झुरळांना घरातून कायमच घालवण्यासाठी अनेक सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय उपलब्ध आहेत. घरातील काही नैसर्गिक घटकांचा वापर करुन तुम्ही झुरळांना दूर ठेवू शकता.

3 / 11
बेकिंग सोडा आणि साखर हे सम प्रमाणात मिसळून हे मिश्रण झुरळं येणाऱ्या ठिकाणी टाकावे. हे मिश्रण खाल्ल्याने झुरळं विषबाधा होऊन मरतात.

4 / 11
गरम पाण्यात व्हिनेगर मिसळून स्वयंपाकघर आणि बाथरूममध्ये फवारणी करा. यामुळे झुरळं घरात येत नाहीत.

5 / 11
लिंबाच्या साली घराच्या आसपास ठेवा. झुरळांना लिंबाच्या रसाचा सुगंध आवडत नाही. त्यामुळे ते घरात येत नाही.

6 / 11
झुरळांना तमालपत्रांचा सुगंध सहन होत नाही. त्यामुळे घराच्या कोपऱ्यात तमालपत्रांची पाने ठेवल्याने झुरळे दूर राहतात.

7 / 11
साबणाचे पाणी थेट झुरळांवर फवारल्यास त्यांच्या श्वसनमार्गावर परिणाम होतो आणि ती गुदमरून मरतात.

8 / 11
कांदा आणि बोरॅक्सची पेस्ट झुरळांना आकर्षित करते. यामुळे झुरळं मरतात.

9 / 11
रॉकेलचा सुगंध झुरळांना आवडत नाही. कापसाच्या बोळ्याला रॉकेल लावून घराच्या कोपऱ्यात ठेवा. यामुळे झुरळे दूर राहतात.

10 / 11
झुरळांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी घराची स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

11 / 11
झुरळांना ओलावा आवडतो. त्यामुळे घरातील ओलावा कमी ठेवणे आणि गळणाऱ्या नळांची त्वरित दुरुस्ती करणे आवश्यक आहे.