
अंडी शाकाहारी की मांसाहारी हा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. या प्रश्नामुळे अनेक लोकांमध्ये गोंधळ निर्माण होतो. याबद्दल अनेक गैरसमज आहेत. आज आम्ही तुम्हाला अंड शाकाहारी की मांसाहारी याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुमचे सर्व गैरसमज दूर होतील.

शास्त्रीय दृष्ट्या अंडी हे कोंबडीपासून मिळणारे एक पुनरुत्पादक उत्पादन आहे. अंडी ही जिवंत प्राण्यापासून म्हणजेच कोंबडीपासून तयार केली जातात. त्यामुळे पारंपारिकपणे त्यांना मांसाहारी श्रेणीत वर्गीकृत केले जाते.

अंड्याचे प्रामुख्याने दोन भाग असतात. यातील पहिला भाग पांढरा भाग आणि दुसरा भाग म्हणजे पिवळा बलक. या दोन्ही भागांचे वर्गीकरण भिन्न असते. अंड्याचा पांढरा भाग प्रामुख्याने प्रथिनांनी (Proteins) बनलेला असतो. या भागात गर्भ नसतो. म्हणजेच या भागातून नवीन जीव तयार होण्याची शक्यता नसते. या कारणामुळे, अंड्याचा पांढरा भाग अनेकदा शाकाहारी मानला जाऊ शकतो.

अंड्यातील पिवळा बलक प्रथिने, जीवनसत्त्वे (Vitamins) आणि चरबी (Fat) यांचा स्रोत असतो. अंड्यामध्ये गर्भ या पिवळ्या बलकामध्ये विकसित होण्याची क्षमता असते. बाजारात मिळणारी बहुतेक अंडी अनफर्टाईल असली तरी, गर्भधारणेच्या क्षमतेमुळे या भागाला मांसाहारी श्रेणीत ठेवले जाते.

भारतीय धार्मिक श्रद्धांमध्ये जिवंत प्राण्यापासून मिळालेले उत्पादन असल्यामुळे अंडी खाणे हा मांसाहार मानला जातो. अनेक धार्मिक आणि पारंपारिक शाकाहारी लोक अंडी खाणे पूर्णपणे टाळतात.

पाश्चात्य संकल्पनेत, जे लोक दूध आणि अंडी खातात, परंतु मांस, मासे किंवा चिकन खात नाहीत, त्यांना लॅक्टो-ओवो-व्हेजेटेरियन (Lacto-Ovo-Vegetarian) म्हणून ओळखले जाते.

काही आरोग्य आणि पोषण तज्ज्ञ अंड्यांना उत्तम प्रतीच्या प्रथिनांचा स्रोत मानतात. ते शाकाहारी आहारासाठी ज्यांना प्रथिनांची कमतरता आहे त्यांच्यासाठी एक पर्याय म्हणून समावेश करण्याची शिफारस करतात. त्यामुळे शाकाहारी लोकांनी अंड्याचा पांढरा भाग खावा तर मांसाहारी लोक संपूर्ण अंडे खाऊ शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)