
पुणे शहरातील रास्ता पेठेतील महावितरण कार्यालयामध्ये शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या अधिकारी वर्गा सोबत नियोजित बैठकीसाठीला पोहोचल्या होत्या. दरम्यान एका आजींनी त्यांच्याकडे केलेल्या विनंतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

पुण्यात एका आजींनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आणि म्हणल्या, 'माझा मुलगा आणि सून कामाला जातात.. त्यामुळे मी घरी असल्याने टीव्हीवर दररोज सिरियल बघत असते.'

पुढे त्या आजी म्हणाल्या, 'एक सिरियल 30 मिनिटाची असते. . पण त्यामध्ये जवळपास 20 मिनिटाच्या जाहिराती असतात.' त्यानंतर सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे होते.

आम्ही काय जाहिरातीसाठी पैसे भरतो का ताई यावर तुम्ही काही तरी करा अशी मागणी आजींनी सुप्रिया सुळे यांच्याकडे केली.

आजींची मागणी ऐकून सुप्रिया सुळे यांना हसू आले. तसेच त्यांच्यासोबत तेथे उपस्थित असलेल्या इतर कार्यकर्त्यांना देखील हसू अनावर झाले.