
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष थेट महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

784 पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी असून 9 ऑगस्ट 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटीची तारीख आहे. त्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांना अर्ज ही करावी लागणार आहेत.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे.

mahatransco.in. या साईटवर जाऊन उमेदवारांना अर्ज करावा लागेल. तिथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. 700 रुपये फीस ही उमेदवारांना भरावी लागणार आहे.

अभियंता, सहायक अभियंता ही पदे भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.