
एल्विश यादव याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालीये. एल्विश यादव याचे पाय रेव्ह पार्टीमध्ये चांगलेच खोलात असल्याचे दिसतंय. हेच नाही तर पोलिसांकडून एल्विश यादव याला अटकही करण्यात आलीये. नुकताच एल्विश यादवने पोलिस चाैकशीत मोठे खुलासे केले.

एल्विश यादवने सांगितले की, सेक्टर 51 मध्ये होणाऱ्या रेव्ह पार्टीबद्दल मला माहिती होते. अशा पार्टी नेहमीच होतात. रेव्ह पार्टीमध्ये साप आणले जातात.

पुढे एल्विश यादव म्हणाला, रेव्ह पार्टीमध्ये आणले जाणारे साप हे विषारी नसतात. ते फक्त गळ्यामध्ये घालून एक मजा केली जाते. राहुलला सर्पमित्रासोबत संपर्क करून दिला.

बाकी पुढे जे घडले त्याबद्दल मला माहिती नाही. काही लोक सर्पदंशातून स्नॅक व्हेनमचे व्यसन म्हणून घेतात. त्यानंतर उरलेल्या स्नॅक विषाचे काय करतात, हे माहिती नसल्याचे एल्विशने म्हटले.

पुढील काही दिवसांमध्ये एल्विश यादव याच्याकडून काही मोठे खुलासे देखील केले जाऊ शकतात. मात्र, सध्या तरी एल्विश यादव याच्या अडचणीमध्ये वाढ झालीये.