एकच नंबर गाणं, 18 वर्षांपासून प्रत्येकाचं आवडतं, आजही एकदा ऐकलं तरी दिवसभर मनातून जात नाही

इमरान हाश्मीच्या 18 वर्षांपूर्वींच्या चित्रपटातील प्रचंड सुपरहिट गाणं, जे एकदा ऐकलं तरी चाहते दिवसभर गुणगुणतात. बस, रिक्षा यांमध्ये हमखास हे गाणं ऐकायला मिळतं.

| Updated on: Aug 21, 2026 | 1:33 PM
1 / 5
इमरान हाश्मीच्या चित्रपटांची ओळख केवळ त्याच्या दमदार भूमिकांमुळे नाही तर त्यातील लोकप्रिय गाण्यांमुळेही आहे. प्रेम, विरह आणि वेदना व्यक्त करणारी त्याची गाणी आजही चाहत्यांच्या प्लेलिस्टमध्ये ऐकायला मिळतात. असंच एक गाजलेलं गाणं म्हणजे ‘जन्नत’ चित्रपटातील ‘लंबी जुदाई’.

2 / 5
2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जन्नत’मध्ये इमरान हाश्मी आणि सोनल चौहान मुख्य भूमिकेत होते. कुणाल देशमुख दिग्दर्शित या रोमँटिक-क्राइम ड्रामामधील ‘लंबी जुदाई’ गाण्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली. विरहाचा दर्द रॉक अंदाजात सादर केल्यामुळे या गाण्याची लोकप्रियता आणखी वाढली.

3 / 5
या गाण्याशी संबंधित सर्वात खास नाव म्हणजे कामरान अहमद. पाकिस्तानचे गायक असलेल्या कामरान अहमद यांनी ‘लंबी जुदाई’ हे गाणं केवळ गायलेच नाही, तर त्याचे लेखन आणि संगीतही त्यांनीच केले होते. विशेष म्हणजे, बॉलिवूडसाठी हे त्यांचे पहिले गाणे होते. या एका गाण्याच्या यशामुळे त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी ओळख मिळाली.

4 / 5
‘लंबी जुदाई’मधील विरहाची भावना, रॉक संगीताची शैली आणि कामरान अहमद यांचा आवाज यांचा सुंदर मेळ पाहायला मिळाला. त्यामुळे हे गाणे इमरान हाश्मीच्या गाजलेल्या गाण्यांपैकी एक ठरले. आजही ब्रेकअप किंवा विरहाच्या काळात हे गाणं अनेकांच्या आवडीचे ठरते.

5 / 5
‘जन्नत’ला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरला. त्यानंतर 2012 मध्ये ‘जन्नत 2’ प्रदर्शित झाला. मात्र, ‘जन्नत’ची आठवण झाली की ‘लंबी जुदाई’ या गाण्याचा उल्लेख आवर्जून केला जातो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us