प्रत्येक मुलीच्या पर्समध्ये या 3 गोष्टी असायलाच पाहिजेत, कधीही येऊ शकतात कामी

सध्या मोठ्या प्रमाणात महिलांबाबत घटना समोर येऊ लागल्या आहेत. अशातच आता महिलांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या पर्समध्ये या 3 वस्तू नक्की ठेवल्या पाहिजेत. कोणत्या आहेत त्या वस्तू? जाणून घ्या सविस्तर

| Updated on: May 15, 2026 | 5:19 PM
1 / 5
आजच्या धावपळीच्या जीवनात महिला शिक्षण, नोकरी, व्यवसाय, प्रवास आणि रात्रीच्या शिफ्टसारख्या अनेक जबाबदाऱ्या सक्षमपणे सांभाळताना दिसतात. मात्र या सगळ्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा बनला आहे.

2 / 5
बदलत्या काळात महिलांनी सतर्क आणि सजग राहणे गरजेचे झाले असून, अनेक महिला स्वतःच्या सुरक्षेसाठी काही महत्त्वाच्या वस्तू कायम पर्समध्ये ठेवतात. कारण महिलांची पर्स ही केवळ फॅशन किंवा दैनंदिन वापराची वस्तू नसून ती त्यांच्या आत्मविश्वासाचे आणि सुरक्षिततेचेही प्रतीक मानली जाते.

3 / 5
महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी छोटा फोल्डिंग चाकू किंवा मल्टीपर्पज सेफ्टी टूल पर्समध्ये ठेवावा.  जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.

4 / 5
महिलांनी सुरक्षेसाठी सर्वाधिक वापरली जाणारा पेपर स्प्रे. हा देखील आपल्या पर्समध्ये ठेवावा. कारण हा वापरण्यास सोपा, हलका आणि प्रभावी पर्याय मानला जातो. एखादी संशयास्पद व्यक्ती पाठलाग करत असल्यास किंवा धोक्याची परिस्थिती निर्माण झाल्यास पेपर स्प्रे वापरल्याने समोरच्या व्यक्तीला काही काळ अस्वस्थता जाणवू शकते.

5 / 5
त्याचबरोबर महिलांनी छोटा सेफ्टी अलार्म किंवा पर्सनल अलार्म सोबत ठेवावा. कारण हे उपकरण सुरू केल्यावर मोठा आवाज निर्माण होतो. अचानक झालेला आवाज आसपासच्या लोकांचे लक्ष वेधून घेतो आणि मदत मिळण्याची शक्यता वाढते. विशेषतः रात्री उशिरा प्रवास करताना किंवा निर्जन ठिकाणी हा अलार्म उपयुक्त ठरू शकतो.  टीप : महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भातील ही माहिती सामान्य जागरूकतेसाठी देण्यात आली आहे. कोणतीही सुरक्षा साधने वापरण्यापूर्वी स्थानिक कायदे, नियम आणि तज्ज्ञांचा सल्ला जाणून घेणे आवश्यक आहे.

Follow Us