
आपण बऱ्याचदा ऐकले असेल की, मासिक पाळीत महिलांनी 4 ते 5 दिवस पूर्णपणे आराम केला पाहिजे. मात्र, यादरम्यान अनेक महिला धावपळ करतानाही दिसतात.

हेच नाही तर जीममध्ये वेट देखील उचलतात. मात्र, मासिक पाळीमध्ये असे करणे खरोखरच योग्य आहे का? याबद्दल जाणून घेणार आहोत. कारण अनेक महिलांना यावेळी त्रास होतो.

शक्यतो महिलांनी या काळात अधिकाअधिक विश्रांती घेतली पाहिजे. कारण तुम्हाला त्रास होत नसला तरीही शरीरात अनेक मोठे बदल होत असतात.

मासिक पाळीत जर तुम्ही वेट उचलत असाल तर त्याचा वाईट परिणाम शरीरावर होतो. विशेष म्हणजे पोटातील आतड्यांवर थेट परिणामही होऊ शकतो.

अशावेळी तुम्ही शक्यतो जिममध्ये जाणे टाळा. फार तर फार साधा सोप्पा योगा करणे ठीक आहे. मात्र, जीममध्ये जाऊन व्यायाम करणे धोकादायक ठरू शकते.