AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VHT : पहिल्याच दिवशी धुमधडाका, 22 फलंदाजांची शतकी खेळी, सर्वात भारी खेळी कुणाची?

Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेतील पहिला दिवस फलंदाजांनी गाजवला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह एकूण 22 फलंदाजांनी शतक करुन धमाका केला. मात्र एका फलंदाजांनी द्विशतक केलं. कोण आहे तो?

VHT : पहिल्याच दिवशी धुमधडाका, 22 फलंदाजांची शतकी खेळी,  सर्वात भारी खेळी कुणाची?
Virat Rohit Vaibhav Suryavanshi VHT CenturyImage Credit source: PTI
| Updated on: Dec 24, 2025 | 9:49 PM
Share

विजय हजारे ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिला दिवस फलंदाजांनी आपल्या नावावर केला. पहिल्याच दिवशी 24 डिसेंबरला तब्बल 22 फलंदाजांनी शतक झळकावलं. या 22 खेळाडूमध्ये टीम इंडियासाठी खेळणाऱ्यांचाही समावेश होता. रोहित शर्मा, विराट कोहली, ईशान किशन आणि वैभव सूर्यवंशी यांनी शतक झळकावलं. तसेच इतर 18 फलंदाजांनीही शतक ठोकलं. मात्र रोहित आणि विराट या दोघांनी भाव खाल्ला. दोघांनीही विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत अनेक वर्षांनी कमबॅक केलं. शतक करत कमबॅक केल्याने या दोघांची चर्चा पाहायला मिळाली. मात्र प्रसिद्धीपासून दूर असलेल्या 1 फलंदाजाने रोहित आणि विराटला पछाडलं.

रोहित-विराटचा शतकी धमाका

रोहित शर्मा याने मुंबईसाठी सिक्कीम विरुद्ध दीडशतकी खेळी केली. रोहितने या सामन्यात 155 धावांची खेळी केली. रोहितच्या या खेळीमुळे मुंबईने विजयी सलामी दिली. तर विराटने दिल्लीसाठी शतक ठोकलं. विराटच्या 131 धावांच्या जोरावर दिल्लीने आंध्रप्रदेशवर विजय मिळवला. मात्र बिहार आणि झारखंड टीमने धमाका केला.

बिहारकडून तिघांची शतक, वर्ल्ड रेकॉर्ड

वैभव सूर्यवंशी याच्या बिहार टीमने अरुणाचल प्रदेश विरुद्ध कहर केला. बिहारने लिस्ट ए क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला. बिहारने लिस्ट ए क्रिकेटमधील एका सामन्यात सर्वाधिक 574 धावा केल्या. वैभवने या सामन्यात अवघ्या 36 चेंडूत शतक झळकावलं. वैभव यासह लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला.

बिहारसाठी वैभव व्यतिरिक्त कॅप्टन सकीबुल गनी याने 32 चेंडूत शतक झळकावलं. सकीबुल यासह लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा फलंदाज ठरला. बिहारसाठी वैभव आणि सकीबुल व्यतिरिक्त आयुष लोहारुका यानेही 116 धावांची खेळी केली.

इशान किशनचा झंझावात

झारखंडसाठी कॅप्टन इशान किशन याने कर्नाटक विरुद्ध 33 चेंडूत शतक झळकावलं. इशान यासह लिस्ट ए क्रिकेटमध्ये वेगवान शतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. देवदत्त पडीक्कल याने झारखंड विरुद्ध 147 धावांची चाबूक खेळी करत कर्नाटकला विजयी केलं.

स्वास्तिक सामलचा डबल धमाका

ओडीशाच्या स्वास्तिक सामल याने कमाल केली. स्वास्तिकने सौराष्ट्र विरुद्ध द्विशतक झळकावलं. स्वास्तिकने 169 बॉलमध्ये 212 रन्स केल्या. स्वास्तिकने या खेळीत 21 चौाकार आणि 8 षटकार लगावले. स्वास्तिकच्या खेळीच्या जोरावर ओडीशाने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 345 धावांपर्यंत मजल मारली. मात्र सौराष्ट्रने हे आव्हान पूर्ण केलं. त्यामुळे स्वास्तिकची द्विशतकी खेळी व्यर्थ ठरली.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.