
हिवाळ्यात थंड पाण्यात हात घालण्याचीही इच्छा नसते. अशात थंड पाण्याने अंघोळ करण्याचा साधा कोणी विचारही करत नाही. मात्र, हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केली पाहिजे की, थंड? याबाबत तज्ज्ञ काय सल्ला देतात ते जाणून घेऊयात.

थंड हवामानात गरम पाणी शरीराला त्वरित आराम देते. त्याची उष्णता स्नायूंना आराम देते, कडकपणा कमी करते आणि रक्त प्रवाह सुधारते. जर तुम्हाला सर्दी असेल तर गरम पाणी फायदेशीर आहे.

हिवाळ्यात लोक जास्त गरम पाण्याने अंघोळ करतात, जे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी धोकादायक होऊ शकते. हिवाळ्यात जरी गरम पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर असले तरीही ते अती गरम नसावे.

हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे शक्य नसेल तर अशावेळी आपण किमान कोमट पाण्याने अंघोळ करावी. कारण अति गरम पाणी त्वचेसाठी हानिकारक आहे.

डॉक्टर म्हणतात की, हिवाळ्यात सर्वोत्तम पर्याय म्हणजे कोमट पाण्याने आंघोळ करणे आहे कोमट पाण्याने अंघोळ केल्याने थंडीही वाजत नाही आणि सर्दी होण्याचीही समस्या राहत नाही.