
शेरा हा 25 वर्षांहून अधिक काळ सलमान खानसोबत आहे. तो नेहमीच दबंग खानसोबत असतो आणि त्याला चाहत्यांपासून वाचवतो. रिपोर्ट्सनुसार, शेरा महिन्याला 15 लाख रुपये आणि वार्षिक सुमारे 2 कोटी रुपये कमावतो. ( photos : Social Media)

शाहरुख खानचा अंगरक्षक रवी सिंग हा देखील अनेक वर्षांपासून त्याच्यासोबत आहे. रिपोर्ट्सनुसार, तो सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटी बॉडीगार्ड्सपैकी आहे. त्याची वार्षिक कमाई साधारण 2.7 कोटींच्या आसपास आह. शूटिंग असो की फंक्शन किंवा बाहेर फिरायला जातानाही तो शाहरूख सोबत सावली सारखा असतो आणि अनेकदा तो शाहरुखच्या मुलांचे आर्यन , सुहाना आणि अबराम यांचे रक्षण करताना दिसतो.

अनुष्का शर्माचा बॉडीगार्ड प्रकाश सिंग हा वर्षाला 1.2 कोटी रुपये कमावतो. काही वेळा तो विराट कोहलीसोबतही दिसतो.

अक्षय कुमारच्या विश्वासू अंगरक्षकाचे नाव श्रेयस थेले आहे. शूट, सार्वजनिक कार्यक्रम आणि इतर अनेक ठिकाणी तो स्टारसोबत असतो. अहवालानुसार त्याला वार्षिक 1.2 कोटी रुपये पगार मिळतो.

एका रिपोर्टनुसार, अभिनेत्री दीपिका पडूकोण ही जलाल या तिच्या बॉडीगार्डला 1.2 कोटी रुपये मानधन देते. तो दीपिकासोबत गेल्या कित्येक वर्षांपासून आहे.

हृतिक रोशनचा बॉडीगार्ड मयूर शेट्टीगर आहे. रिपोर्ट्सनुसार, त्यालाही वर्षाला 1.2 कोटी रुपये पगार मिळतो. बॉलीवूडचा ग्रीक गॉड हृतिक जिथे जाईल, तिथे तो सावलीसारखा सोबत असतो.