
सकाळी रिकाम्या पोटी अंजिराचे पाणी पिणे आरोग्यासाठी फार चांगले मानले जाते. सकाळी सकाळी अंजिराचे पाणी पिल्यास अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते .

विशेष म्हणजे तीन प्रकारच्या लोकांसाठी तर सकाळी अंजिराचे पाणी पिणे म्हणजे वरदानच ठरू शकते. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे. त्यांच्यासाठी रिकाम्या पोटी अंजिराचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. अंजीरच्या पाण्यात फायबर असतात. त्यामुळे अंजीरच्या पाण्याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो.

ज्या लोकांना थकवा, तणाव जावणतो त्यांनीही अंजिराच्या पाण्याचे सेवन करायला हरकत नाही. अंजीरमध्ये आयरन आणि मिनरल्स असतात. त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते.

ज्या लोकांना हाय कोलेस्टेरॉल आहे त्यांनी अंजिराचे पाणी पिल्यास फायदा होऊ शकतो. अंजीरमध्ये पोटॅशियम आणि अँटी ऑक्सिडंट असतात. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हाय कोलोस्टेरॉल असणाऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. सकाळी रिकाम्या पोटी अंजिराचे पाणी पिल्यास कोलेस्टेरॉलवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही यातील कोणत्याही माहितीचा दावा करत नाही किंवा समर्थनही देत नाही. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)