
निरोगी आरोग्यासाठी सकाळचा नाश्ता अत्यंत महत्वाचा ठरतो. यामुळे अनेक लोक सकाळचा नाश्ता हेल्दी आणि आरोग्यासाठी किती फायदेशीर याचा विचार करतात. नेहमीच सर्वांना प्रश्न पडतो की, इडली की उपमा दोन्हीपैकी कोणते आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

इडली ही तांदूळ आणि उडदाच्या डाळीपासून तयार होते. इडली खूप हलका आणि पौष्टिक नाश्ता आहे. इडलीमध्ये कार्बोहायड्रेट्सचा एक उत्तम स्रोत आहे. शिवाय ती फक्त वाफेवर तयार होते.

उपमा देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. उपम्यामध्ये अनेक भाजा टाकून तो तयार केला जातो. मात्र, त्यामध्ये तेलाचा वापर होतो. इडली तेलाशिवायही तयार होते.

वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्यासाठी इडली आणि उपमा दोन्ही फायदेशीर आहे. मात्र, उपम्याच्या तुलनेत इडली ही अधिक फायदेशीर नक्कीच आहे.

मध्यम आकाराच्या इडलीमध्ये 35 ते 39 किलोकॅलरीज असतात. दुसरीकडे उपम्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. मात्र, उपमा तयार करताना तेलाचा वापर होतो.