
आपण बऱ्याचदा आपल्या आवडीच्या चवीनुसार काही खाद्यपदार्थ खातो जे आरोग्यास हानी पोहोचवतात. यामध्ये मसालेदार चिप्स, कोल्ड ड्रिंक्स, बर्गर, पिझ्झा, तळलेले पक्वान्न आणि चीझी फ्राईज यांचा समावेश होतो. अशा पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण (Cholesterol Level) गरजेपेक्षा जास्त वाढते.

उच्च कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये साचून त्यांना ब्लॉक करते. यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते आणि काही प्रकरणांमध्ये हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते. अशा वेळी वेळीच आहारात सुधारणा करून, व्यायाम करून आणि जंक फूड टाळून कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करता येते. तसेच आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांविषयी सांगणार आहोत जे कोलेस्ट्रॉल कमी करताता. चला जाणून घेऊया...

सोयाबीन किंवा सोयापासून बनणारे खाद्यपदार्थ कोलेस्ट्रॉल कमी करण्यात प्रभावी ठरतात. यामध्ये सोया दूध आणि टोफू यांचा समावेश आहे. दिवसात २५ ग्रॅमपर्यंत सोया प्रोटीन घेतल्याने बॅड कोलेस्ट्रॉल ६ टक्क्यांपर्यंत कमी होण्यास मदत होऊ शकते.

फायबरने समृद्ध असलेले ओट्स (Oats) कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या आहाराचा भाग बनवता येतात. यामध्ये आढळणारे सोल्युबल फायबर बऱ्याच प्रमाणात बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते. याशिवाय, हे रक्तवाहिन्यांना कोलेस्ट्रॉल शोषण्यापासून रोखण्यास मदत करते.

बीन्स हेदेखील सोल्युबल फायबरचे उत्तम स्रोत आहेत. शरीर हे सहज पचवते आणि खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही, उलट पोट भरलेले राहते. निरोगी हृदयासाठी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बीन्स (Beans) ला आहाराचा भाग बनवता येईल.

पेय पदार्थांमध्ये ग्रीन टी (Green Tea) कोलेस्ट्रॉलवर प्रभावी मानली जाते. याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलचे उत्पादन कमी होते आणि आधीपासून साचलेले कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत मिळते. ग्रीन टी साध्या पद्धतीने बनवून प्यावी किंवा माचाच्या स्वरूपातही याचे सेवन करता येते.

कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी फॅटी फिशचे सेवनही करता येते. यामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स असतात, जे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करतात. याशिवाय, ओमेगा-३ हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही पदार्थ सुरु कु नका)