45 वर्षीय अभिनेत्री, 18 व्या वर्षी केलं लग्न, दोनदा घटस्फोट! सौंदर्याच्या बाबतीत मुलीला देतेय टक्कर

वय फक्त एक आकडा आहे, हे 45 वर्षीय अभिनेत्रीने सिद्ध केलं आहे. आपल्या सौंदर्याने सर्वांचं मन जिंकणाऱ्या या अभिनेत्रीच्या आयुष्याची कहाणी खूप रंजक आहे. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी लग्न बंधनात अडकलेल्या या अभिनेत्रीने आयुष्यातील चढ-उतार लहान वयातच अनुभवले आहेत.

| Updated on: Oct 04, 2025 | 11:42 AM
1 / 11
बॉलिवूडच्या झगमगाडाच्या दुनियेत काही तारे आपल्या सौंदर्याने आणि उत्साहाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. अशीच एक अभिनेत्री आहे, जी 45 वर्षांची आहे. तरीही तिच्या सौंदर्याने आणि अदांनी ती नव्या अभिनेत्रींना टक्कर देत आहे. ती वयाच्या 18 व्या वर्षी लग्नबंधनात अडकली, पण आयुष्याने तिच्यासाठी सोपे मार्ग निवडले नाहीत. दोनदा घटस्फोटाच्या वेदना सहन केल्यानंतरही तिने हार मानली नाही आणि प्रत्येक वेळी अधिक मजबुतीने पुढे उभी राहिली. तिचा फिटनेस, स्टाइल आणि आत्मविश्वास सर्वांना थक्क करतो. आजही तिची एक झलक लाखो हृदयांची धडकन वाढवते. जाणून घ्या ती कोण आहे...

2 / 11
टीव्हीवरून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री श्वेता तिवारीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिने टीव्हीवर तर आपली छाप पाडलीच, पण आता वेब सिरीज आणि चित्रपटांमध्येही ती आपलं वर्चस्व प्रस्थापित करत आहे.

3 / 11
ही अभिनेत्री आज आपला 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. तिचे व्यावसायिक आयुष्य जितकं यशस्वी आहे, तितकंच तिचं वैयक्तिक आयुष्य चढ-उतारांनी भरलेलं आहे.

4 / 11
श्वेता तिवारीला प्रथम 1999 मध्ये आलेल्या ‘कलीरे’ या मालिकेत पाहिलं गेलं. त्यानंतर ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेने तिचं आयुष्य बदललं, कारण ती प्रेरणा बनून घराघरात पोहोचली. प्रेरणा आणि अनुरागची जोडी आजही लोकांच्या स्मरणात आहे.

5 / 11
श्वेता तिवारीने स्वतः खुलासा केला होता की तिच्या पहिल्या मालिकेचं शूटिंग सलग 72-72 तास चालायचं. घरी जाण्यासाठी वेळ मिळायचा नाही आणि पे-चेक 30 दिवसांचा नव्हे, तर 45 दिवसांचा मिळायचा.

6 / 11
श्वेता तिवारीने वयाच्या 12 व्या वर्षी कमवायला सुरुवात केली होती, कारण तिचं कुटुंब आर्थिक अडचणींना तोंड देत होतं. कुटुंबाला मदत करण्यासाठी तिने वयाच्या 12 व्या वर्षी ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम केलं. त्यावेळी तिची पहिली कमाई 500 रुपये होती, पण आज ती एका एपिसोडसाठी जवळपास 3 लाख रुपये घेते आणि आपल्या दोन्ही मुलांचं एकटीने संगोपन करत आहे.

7 / 11
वयाच्या 15 व्या वर्षी तिने टीव्हीवर पदार्पण केलं आणि दुसऱ्याच मालिकेतून ती प्रसिद्ध झाली. पण त्याचवेळी तिचं वैयक्तिक आयुष्य खूपच खडतर होतं. श्वेताला लहान वयातच प्रेम झालं आणि 18 व्या वर्षी तिने भोजपुरी अभिनेता राजा चौधरी याच्याशी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केलं.

8 / 11
दोघांना एक मुलगी, पलक झाली, पण कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाणीच्या आरोपांनंतर दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर श्वेता तिवारी आपल्या मुलीचं, पलकचं, एकटीने संगोपन करत होती. तिने एका जुन्या मुलाखतीत खुलासा केला होता की कामासोबत मुलीचं संगोपन करणं खूप कठीण होतं.

9 / 11
काही वर्षं एकटं आयुष्य काढल्यानंतर श्वेता तिवारीच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाने फुललं. 2013 मध्ये तिने सेटवर भेटलेल्या अभिनेता अभिनव कोहलीशी लग्न केलं आणि मुलगा रेयांशला जन्म दिला.

10 / 11
पण या लग्नातही तिला फक्त वेदनाच मिळाल्या. हे नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि लग्नाच्या तीन वर्षांनंतरच दोघांचा घटस्फोट झाला. आता श्वेता तिवारी वयाच्या 44 व्या वर्षी आपल्या दोन्ही मुलांसोबत एकटीने आयुष्य जगत आहे.

11 / 11
श्वेता तिवारी आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे तर चर्चेत असतेच, पण तिच्या सौंदर्यासाठीही ती खूप प्रसिद्ध आहे. 45 वर्षांची ही अभिनेत्री आजही 25 वर्षीय नवख्या अभिनेत्रींना सौंदर्याच्या बाबतीत तगडी टक्कर देते. सोशल मीडियावर लोक तिला आणि तिची मुलगी पलक यांना एकत्र पाहून बहिणी समजतात.