
कंगना राणावत हिच्यासोबत चंदीगड विमानतळावर हैराण करणारा प्रकार घडला. CISF च्या कर्मचारी महिलेने थेट कंगना राणावत हिच्या कानाखाली मारली. फक्त कंगनाच नाही तर बॉलिवूडच्या इतरही काही कलाकारांना कानाखाली यापूर्वी मारण्यात आलीये.

सलमान खान हा सोहेल खान आणि सुष्मिता सेन यांच्यासोबत एका पार्टीत पोहचला होता. यावेळी एका बिल्डरच्या मुलीने थेट सलमान खान याच्या खानाखाली मारली होती.

2022 मध्ये एका पुरस्कार सोहळ्यावेळी रणवीर सिंह याच्या भोवती लोकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी गर्दीतून एका व्यक्तीने रणवीर सिंह याच्या कानाखाली मारली होती.

गाैहर खान हिच्या खानाखाली देखील मारण्यात आल्याची घटना घडलीये. 2014 मध्ये थेट एका कार्यक्रमाच्या वेळी एका व्यक्तीने तिच्या कानाखाली जाळ काढला होता.

शाहरुख खान याने स्वत: च सांगितले होते की, एकदा रेल्वेमध्ये एका महिलेने त्याच्या कानाखाली दिली होती. या यादीमध्ये शाहरुख खानच्या नावाचा देखील समावेश आहे.

आदित्य नारायणला एका मुलीने पबमध्ये कानाखाली मारली होती. ही घटना 2011 मधील असल्याचे सांगितले जाते. दारूच्या नशेत असताना आदित्य नारायणच्या कानाखाली जाळ काढण्यात आला होता.