
पोस्ट ऑफिसची आवर्ती ठेव योजनेत (RD Scheme) कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. तुम्हाला दरमहा जितकी रक्कम गुंतवायची याची कोणतीही मर्यादा नाही.

या योजनेवर गुंतवणूकदारांना 6.7 टक्के दराने व्याज मिळते. हा व्याजदर बँकेच्या मुदत ठेव योजनेपेक्षा चांगला आहे. या योजनेत पैसा सुरक्षित राहतो. गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यावी लागत नाही.

जर तुम्ही दरमहा 50 हजारांची गुंतवणूक करत असाल तर 5 वर्षांत एकूण 30 लाख रुपये जमा होतील. सध्याच्या 6.7 टक्के व्याज दराने त्यावर 5 वर्षांत 5.68 लाखांचे व्याज देण्यात येईल. म्हणजे एकूण 5 वर्षांत गुंतवणूकदाराकडे 35 लाख रुपये जमा होतील.

या योजनेत 10 वर्षांवरील मुला-मुलींच्या नावे खाते उघडता येते. त्यासाठी आई-वडिलांची कागदपत्रं लागतात. जेव्हा खातेदार 18 वर्षांचा होतो त्याला ई-केवायसी पूर्ण करावी लागते. मोबाईल बँकिग अथवा इंटरनेट बॅकिंग आधारे हे खाते उघडता येते.

तुम्हाला दरमहा निश्चित तारखेला, ठराविक हप्ता जमा करावा लागतो. जर खाते महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत उघडले तर पुढील महिन्याच्या 15 तारखेपर्यंत हप्ता जमा करावा लागतो. 15 तारखेनंतर खाते उघडले तर नियमाप्रमाणे पुढील महिन्याच्या संबंधित तारखेपर्यंत रक्कम जमा करावी लागते.

या खात्यावर कर्ज सुद्धा घेता येते. तुमचे खाते कमीत कमी 1 वर्ष जुने असेल आणि त्यात तुम्ही नियमीत दरमहा रक्कम जमा केलेली असेल तर त्या रक्कमेवर 50 टक्क्यांपर्यंत कर्ज घेता येते. त्यावर 2 टक्के अधिक व्याज द्यावे लागते. कर्ज हप्त्याने अथवा एकरक्कमी चुकते करता येते.