
आपल्या देशात प्रत्येक शुभ कार्यासाठी रांगोळी निश्चितच दारात काढली जाते. रांगोळी ही शुभतेचे प्रतीक मानली जाते.

बाप्पाचे स्वागत करण्यासाठी आणि गणपतीची आनंदाने आणि उत्साहाने स्थापना करण्यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या दारासमोर ही सोपी रांगोळी सहज काढू शकता.

आता अनेक जण ब्लॉकमध्ये राहात असल्यामुळे रांगोळी काढण्यासाठी फार मोठी जागा नसते. अशात तुम्ही छोटी पण रंगीत रांगोळी नक्की काढू शकता...

जर तुम्ही खास प्रकारची रांगोळी बनवण्याचा विचार करत असाल तर ही डिझाइन तुमच्यासाठी योग्य आहे. लाल, हिरवा आणि पांढऱ्या रंगांनी बनलेली ही रांगोळी सहज बनवता येते.

रांगोळीत बाप्पाचे चित्र बनवून तुम्ही त्यासोबत श्री गणेशाय नम: आणि शुभ-लाभ लिहू शकता. अशी रांगोळी शुभतेचे प्रतीक आहे.