Gautami Patil: गौतमी पाटीलसोबत दिसणारा तो मुलगा कोण? चर्चांना उधाण
Gautami Patil: सध्या सोशल मीडियावर गौतमी पाटीलचे फोटो हे चर्चेचा विषय ठरले आहेत. तिच्या फोटोंमध्ये दिसणारी व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

नृत्यांगना गौतमी पाटील ही कायमच चर्चेत असते. तिने तिच्या नृत्याने अनेकांची मने जिंकली आहेत. गौतमी तिच्या डान्सशिवाय खासगी आयुष्यामुळे देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. सध्या सोशल मीडियावर गौतमीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये दिसणारा तो मुलगा कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
गौतमी पाटीलने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर गणेशोत्सवादरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवरुन सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगली आहे.
गौतमीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आहे. त्यामध्ये लालबागचा राजा, मुंबईचा राजा, परळचा राजा, गणेश गल्लीचा राजा आणि इतर काही मानाच्या गणपतींचा समावेश आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर गौतमीने फोटो शेअर करताच व्हायरल झाले. अनेकांनी हे या फोटोमध्ये दिसणारा तरुण कोण आहे असा प्रश्न विचारला आहे.
गौतमी पाटील जेथे जेथे बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गेली तेथे तेथे तिच्यासोबत एक तरूण दिसत आहे. हा तरुण कोण आहे? असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.