Gautami Patil : तुझ्याबरोबर …गौतमी पाटीलसोबत लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यावर अभिनेत्याची खास पोस्ट चर्चेत

लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या लग्नाच्या व्हायरल व्हिडीओने अनेकांना बुचकळ्यात पाडले. नवरदेवाच्या वेशात ओंकार राऊतसोबत दिसलेली गौतमीने उखाणाही घेतला. पण ही सर्व 'गच्ची' या नवीन अल्बम गाण्याचं शूटिंग होतं. ओंकारने गौतमीसोबतचे फोटो पोस्ट करत, शूटिंगचा अनुभव सांगितला असून, हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

| Updated on: Feb 19, 2026 | 1:12 PM
1 / 6
लोकप्रिय नृत्यांगना असलेली गौतमी पाटील (Gautami Patil) हिला वेगळ्या ओळखीच गरज नाही. ती नेहमीच चर्चेत असते. पण नुकताच तिच्या लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. (Photo : Instagram)

2 / 6
या व्हिडीओत ती छान बुट्टे असलेली हिरव्या रंगाची साडी नेसून, दागिने, केसांत गजरा माळून आणि डोक्यावर मुंडावळ्या अशा पेहरावात वधूच्या वेषात दिसली. तर तिच्या शेजारीच एक तरुण नवरदेवाच्या वेषात दिसला. एखाद्या लग्नाचा व्हिडीओ वाटणाऱ्या या पोस्टमध्ये गौतमीने पतीसाठी खास उखाणाही घेतला. पाहता पाहता तो व्हायरल झाला.

3 / 6
. गौतमीसोबत या व्हिडीओत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता ओंकार राऊतही होता. ओंकारसाठी तिने खास उखाणाही घेतला. ‘ ना वाय-फाय, ना इंटरनेट, गच्चीवर झाली आमची पहिली भेट…ओंकार रावांचं नाव घेते, आमची जोडी एकदम परफेक्ट !’ हसतमुखाने असा उखाणा घेत लाजलेल्या गौतमीने शेजारीच उभ्या असलेल्या ओंकारच्या खांद्यावर लाडाने डोकंही ठेवलं.

4 / 6
ओंकार गौतमीचं खर लग्न झालं खरं लग्न नसून एका गाण्याचं शूटिंग असल्याचं उघड झालं. गच्ची या अल्बम साँगमधील हा व्हिडीओ असल्याचं समोर आलं.

5 / 6
आता याच गाण्याच गौतमीसोबत झळकलेल्या ओंकारने गौतमीसोबतचे खास फोटो पोस्ट केले आहेत. तसेच त्याने तिच्यासाठी एक विशेष कॅप्शनही लिहीली आहे.

6 / 6
"गच्ची...सगळ्यांनी नक्की पाहा...गौतमी तुझ्याबरोबर काम करून खरंच खूप मज्जा आली", असं ओंकारने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टवर हजारो लाईक्स आल्या असून कमेंट्सचाही पाऊस पडलाय. अनेकांना दोघांचे हे फोट खूप आवडलेत.