हीटिंग रॉड की गिझर, गरम पाण्यासाठी कोणता पर्याय योग्य; वीजबिलाचे गणित काय?

गरम पाण्यासाठी गिझर आणि हीटिंग रॉड या दोन पर्यायांची तुलना या लेखात केली आहे. हीटिंग रॉड सुरुवातीला स्वस्त असला तरी, सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतो.

| Updated on: Nov 04, 2025 | 10:31 AM
1 / 8
हिवाळ्यात गरम पाण्यासाठी अनेक लोक गिझर वापरतात, तर काहीजण यासाठी हीटिंग रॉड्स देखील वापरतात. पण गरम पाण्यासाठी नेमकं हीटिंग रॉड्स योग्य की गिझर योग्य, असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो.

2 / 8
तसेच गरम पाण्यासाठी बाजारात प्रामुख्याने हीटिंग रॉड आणि गिझर हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. मात्र यातील काय वापरल्याने वीजेचे बिल कमी येते. या दोघांचेही स्वतःचे फायदे-तोटे आहेत.

3 / 8
सुरुवातीला होणाऱ्या खर्चाचा विचार केल्यास हीटिंग रॉडची किंमत साधारणपणे २०० ते ६०० रुपये, ३-लिटर इन्स्टंट गिझरची किंमत २००० ते ४००० रुपये इतकी असते. त्यामुळे ज्यांचे बजेट अगदी कमी आहे किंवा ज्यांना तात्पुरती सोय हवी आहे. त्यांच्यासाठी हीटिंग रॉड हा परवडणारा पर्याय आहे.

4 / 8
हीटिंग रॉड्समध्ये उच्च विद्युत प्रवाह वापरून पाणी गरम केले आहे. ते बादलीत बुडवून वापरले जातात. कोणत्याही निष्काळजीपणामुळे किंवा पाण्यात हात घातल्यास विजेचा जोरदार शॉक लागण्याचा धोका असतो. हीटिंग रॉडच्या चुकीच्या वापरामुळे अनेक अपघात होतात.

5 / 8
याउलट, गिझर हे भिंतीवर सुरक्षितपणे बसवलेले असते. त्यात शॉक-प्रूफ यंत्रणा आणि ऑटो-कट सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये असतात. त्यामुळे, गिझर वापरण्यास अत्यंत सुरक्षित मानले जाते.

6 / 8
गिझर हा हीटिंग रॉडपेक्षा अधिक स्वस्त ठरतो. याचे मुख्य कारण म्हणजे गिझरमध्ये ऑटो-कट फीचर. एकदा पाणी पुरेसे गरम झाल्यावर गिझर आपोआप वीज वापरणे थांबवतो. ज्यामुळे विजेची बचत होते.

7 / 8
याउलट, हीटिंग रॉड (१.५ kW क्षमतेचा) अर्धा तास चालल्यास ०.७५ युनिट वीज वापरतो आणि तो पाण्यात तसाच राहिल्याने सतत वीज वापरत राहतो, ज्यामुळे महिन्याच्या अखेरीस बिल जास्त येऊ शकते. त्यामुळे गिझर महाग असला तरी त्यातील तंत्रज्ञानामुळे तो विजेच्या बिलात बचत करतो.

8 / 8
हीटिंग रॉड सुरुवातीला खिश्याला परवडणारा असला तरी तो वापरताना असुरक्षित आणि निष्काळजीपणामुळे विजेच्या बिलात महागात पडू शकतो. याउलट, गिझर सुरुवातीला महाग असतो, परंतु तो वापरण्यास अत्यंत सुरक्षित आहे. गिझरच्या त्याच्या ऑटो-कट वैशिष्ट्यामुळे दीर्घकाळ विजेची बचत होते. त्यामुळे, सुरक्षितता आणि महिन्याचे कमी बजेट हे जर तुमचे प्राधान्य असेल, तर गिझर हाच सर्वोत्तम आणि योग्य पर्याय आहे.