54 वर्षांपूर्वीच्या या गाण्यामुळे तयार झाली मालिका, बनले 1625 भाग, आजही लोक वेळ काढून बघतात
54 वर्षांपूर्वीच्या या गाण्यावरून सुरु झालेली मालिका. ठरली इतकी लोकप्रिय की बनले 1625 भाग. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे आजही गाणं प्रचंड लोकप्रिय.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक गाणी काळाच्या ओघातही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. यातीलच एक गाजलेले गाणे म्हणजे ‘गुम है किसी के प्यार में’. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजातील हे गाणे आजही संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरते.
विशेष म्हणजे, याच गाण्याच्या नावावरून स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका ‘गुम है किसी के प्यार में’ हिचे नाव ठेवण्यात आले होते. या मालिकेचे प्रमोशन खुद्द अभिनेत्री रेखा यांनीही केले होते.
‘गुम है किसी के प्यार में’ हे गाणं 1972 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रामपूर का लक्ष्मण’ या चित्रपटातील आहे. ‘गुम है किसी के प्यार में, दिल सुबह-शाम…’ असे या गाण्याचे बोल असून किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी ते गायले होते.
या गाण्याच्या नावावरूनच ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेचे शीर्षक ठेवण्यात आले. 5 ऑक्टोबर 2020 रोजी सुरू झालेली ही मालिका 4 जुलै 2025 पर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आली.
या मालिकेत आयशा सिंह हिने सईची, नील भट्ट याने विराटची, तर ऐश्वर्या शर्मा हिने पत्रलेखाची भूमिका साकारली होती. या कलाकारांच्या अभिनयामुळे मालिकेला मोठी लोकप्रियता मिळाली.