Girija Oak: नॅशनल क्रश गिरीजा ओकचा कधीही न पाहिलेला अंदाज; हाय स्लिट गाऊनमधील लूक पाहून प्रिया बापट म्हणाली..

Girija Oak: लाल रंगाचा गाऊन, आत्मविश्वासपूर्ण अंदाज आणि गिरीजाचा खास लूक यामुळे हे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. तिच्या चाहत्यांनीही कमेंट्समध्ये तिच्या सौंदर्याचं आणि स्टाइलचं कौतुक केलं आहे. त्यामुळे ‘नॅशनल क्रश’ म्हणून चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या गिरीजाचा हा नवा अंदाज सोशल मीडियावर चांगलाच भाव खाऊन जाताना दिसत आहे.

| Updated on: Oct 05, 2026 | 8:05 AM
1 / 6
Girija Oak: मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक तिच्या अभिनयासोबतच हटके स्टाइलसाठीही कायम चर्चेत असते. साध्या, सोज्वळ भूमिकांपासून ते ग्लॅमरस फोटोशूटपर्यंत प्रत्येक लूकमध्ये ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. आता गिरीजाने केलेल्या एका नव्या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

Girija Oak: मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक तिच्या अभिनयासोबतच हटके स्टाइलसाठीही कायम चर्चेत असते. साध्या, सोज्वळ भूमिकांपासून ते ग्लॅमरस फोटोशूटपर्यंत प्रत्येक लूकमध्ये ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. आता गिरीजाने केलेल्या एका नव्या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

2 / 6

लाल रंगाच्या हाय-स्लिट गाऊनमधील तिचा अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. गिरीजाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने लाल रंगाचा आकर्षक गाऊन परिधान केला असून, त्याचा हाय-स्लिट डिझाइन तिच्या लूकला आणखी ग्लॅमरस टच देत आहे.

3 / 6

मिनिमल पण स्टायलिश अॅक्सेसरीज, खुललेले शॉर्ट केस आणि आत्मविश्वासपूर्ण पोझेस यामुळे तिचं फोटोशूट अधिकच खास दिसत आहे. गिरीजाचा हा लूक तिच्या नेहमीच्या अंदाजापेक्षा काहीसा वेगळा आहे. त्यामुळेच तिच्या चाहत्यांसाठीही हे फोटो सरप्राइज ठरले आहेत.

4 / 6

मराठी इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने लोकप्रिय असलेली गिरीजा अशा ग्लॅमरस अवतारात दिसल्याने तिच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, गिरीजाच्या या फोटोंवर तिच्या इंडस्ट्रीतील मैत्रिणींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

5 / 6

अभिनेत्री प्रिया बापट हिने गिरीजाच्या फोटोवर ‘चिकनी’ अशी भन्नाट कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. प्रियाच्या या कमेंटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्री सखी गोखले हिनेही गिरीजाच्या या ग्लॅमरस लूकचं कौतुक केलं आहे. तर मुग्धा गोडबोलेनं लिहिलंय, 'मला वाटलं सध्या 80 च्या दशकाचा ट्रेंड सुरू आहे, सुपर्ब'.

6 / 6

गिरिजा ओक सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील क्षण, कुटुंबासोबतचे फोटो, प्रवास आणि कामाशी संबंधित अपडेट्स ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र तिच्या ग्लॅमरस फोटोशूटला मिळणारा प्रतिसाद नेहमीच विशेष असतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us