
तुमच्या पैकी जवळपास प्रत्येकाने रेल्वेने प्रवास केला असेल. सध्या बऱ्याच गाड्या या लाईटवर चालतात. मात्र काही गाड्या अजूनही डिझेलवर चालतात. तुम्ही कधी विचार केला आहे का, की एका तासाला रेल्वेच्या इंजिनला किती लिटर डिझेल लागते?

रेल्वेला एका तासाला किती लिटर डिझेल लागते हे डब्यांच्या संख्येवर आणि तिच्या वजनावर अवलंबून असते. 24 ते 25 डबे असलेल्या ट्रेनला एक किलोमीटर चालण्यासाठी अंदाजे 6 लिटर डिझेल लागते.

12 डबे असलेल्या एक्सप्रेस ट्रेनला प्रति किलोमीटरसाठी 4.5 लिटर इंधन लागते. तसेच मालगाडी असेल तिचे वजन जास्त असते, त्यामुळे मालगाडीला एका किलोमीटर साठी जास्त डिझेल लागते.

एका अहवालानुसार जर 24 डब्यांची एक्सप्रेस ट्रेन 50 किमी वेगाने प्रवास करत असेल तर तिला एका तासात अंदाजे 200 लिटर डिझेल लागते. मात्र ही माहिती तंतोतंत बरोबर किंवा अधिकृत नाही.

भारतात दररोज 13198 गाड्या धावतात, ज्यामध्ये एक्सप्रेस, पॅसेंजर आणि लोकल गाड्यांचा समावेश आहे. यातील आता अनेक गाड्या विजेवर धावतात, त्यामुळे रेल्वेला लागणाऱ्या डिझेलमध्ये घट झाली आहे.