GK : पाकिस्तानच्या शाळांमध्ये हिंदी शिकवली जाते का?
Hindi in Pakistan : हिंदी ही भारतातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. भारतातील जवळपास सर्व शाळांमध्ये हिंदी शिकवली जाते. मात्र पाकिस्तानच्या शाळांमध्ये हिंदी शिकवली जाते का हे आज आपण जाणून घेणार आहोत.

कमकुवत शिक्षण व्यवस्था : कोणत्याही देशाचा विकास त्याच्या शिक्षण व्यवस्थेवर अवलंबून असतो. पाकिस्तानातील कमकुवत शिक्षण व्यवस्थेमुळे हा देश खूप मागे आहे.

हिंदी शिकवण्यावर बंदी : माध्यमांच्या वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर हिंदी अभ्यास आणि अध्यापनावर बंदी घालण्यात आली. येथील शाळांमध्ये हिंदी शिकवली जात नाही.

हिंदीऐवजी ही भाषा शिकवली जाते : पाकिस्तानमध्ये उर्दू ही प्राथमिक भाषा असल्याने, त्यांच्या शाळांमध्ये उर्दूला अधिक महत्त्व दिले जाते. मात्र कराची विद्यापीठ आणि ओरिएंटल कॉलेजसारख्या काही शैक्षणिक संस्थांमध्ये हिंदी शिकवली जात असल्याची माहिती समोर आली आहेय

1947 पूर्वी हिंदी शिकवली जात होती : 1947 पूर्वी लाहोरसारख्या सध्याच्या पाकिस्तानच्या भागात हिंदी शिकवली जात होती. मात्र स्वातंत्र्यानंतर, शाळा आणि महाविद्यालयांमधून ती काढून टाकण्यात आली.

मदरसा शिक्षण प्रणाली : पाकिस्तानमध्ये मदरसा शिक्षण अधिक प्रचलित आहे. येथील ग्रामीण भागातील मुले प्रामुख्याने शिक्षणासाठी मदरशांमध्ये जातात.