
भारताच्या उत्तरेकडील हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांना दोन राजधान्या आहेत. उन्हाळ्यासाठी आणि हिवाळ्यासाठी असा या दोन राजधान्या आहेत. याची माहिती जाणून घेऊयात.

हिमाचल प्रदेश या राज्याला उन्हाळी आणि मुख्य राजधानी ही शिमला आहे, तर धर्मशाळा हिवाळी राजधानी आहे. 'देवभूमी' म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश घनदाट जंगले, बर्फाच्छादित शिखरे आणि खोल दऱ्यांनी नटलेला आहे.

या राज्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटन, जलविद्युत निर्मिती आणि फलोत्पादनावर आधारित आहे. शिमला, मनाली, कुल्लू आणि डलहौसी ही येथील प्रमुख पर्यटन स्थळे आहेत, या ठिकाणी देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी असते.

उत्तराखंड या राज्यालाही दोन राजधान्या आहेत. देहरादून ही हिवाळी राजधानी आहे, तर गैरसैण ही उन्हाळी राजधानी आहे. उत्तराखंड हे प्रामुख्याने आपल्या धार्मिक महत्त्वासाठी जगभर ओळखले जाते.

हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानले जाणारे चार धाम (बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री) येथेच आहेत. याशिवाय, ऋषिकेश (योग केंद्र) आणि हरिद्वार (गंगा नदीचे धार्मिक केंद्र) ही शहरेही खूप महत्त्वाची आहेत. या राज्याची अर्थव्यवस्था तीर्थयात्रा आणि साहसी पर्यटनावर मोठ्या प्रमाणावर आधारित आहे.