GK : संपूर्ण जग झोपेत असताना या ठिकाणी होतो सूर्योदय

Sunrise : जगातील प्रत्येक देशात वेगवेगळ्या वेळेला सूर्योदय होतो. जगाच्या नकाशावर पूर्वेकडे असणाऱ्या देशांमध्ये आधी सूर्योदय होतो, तर पश्चिमेकडील देशांमध्ये उशिरा सूर्य उगवतो. कोणत्या ठिकाणी सर्वात आधी सूर्योदय होतो ते जाणून घेऊयात.

| Updated on: Jan 31, 2026 | 11:00 PM
1 / 5
किरिबाती : प्रशांत महासागरातील किरिबाती देशाचा 'लाईन आयलंड्स' हा भाग असा आहे, जिथे जगातील सर्वात आधी सूर्योदय होतो. विशेषतः येथील 'मिलेनियम आयलंड' हे ठिकाण सर्वात आधी नवीन दिवसाचे स्वागत करते.

2 / 5
वेळेचा फरक (UTC +14): किरिबातीमध्ये जगातील सर्वात प्रगत वेळ क्षेत्र आहे (UTC+14). जेव्हा लंडनमध्ये (GMT) दुपारचे 12 वाजलेले असतात, तेव्हा किरिबातीमध्ये पुढच्या दिवसाचे पहाटेचे 2 वाजलेले असतात.

3 / 5
आंतरराष्ट्रीय वार रेषा (IDL): 1995  पूर्वी किरिबाती देश दोन भागात विभागलेला होता. एका भागात एक दिवस तर दुसऱ्या भागात दुसरा दिवस असायचा. प्रशासकीय सोयीसाठी या देशाने आंतरराष्ट्रीय वार रेषेचे स्थान बदलून घेतले, ज्यामुळे हा देश जगातील सर्वात 'वेळेच्या पुढे' असलेला देश बनला.

4 / 5
न्युझीलंडचा दावा: किरिबातीने वेळेत बदल करण्यापूर्वी, न्युझीलंडच्या पूर्वेला असलेल्या चॅथम आयलंड्स (Chatham Islands) आणि गिसबोर्न (Gisborne) शहराला सर्वात आधी सूर्योदय होणारी ठिकाणे मानले जात होते. वर्षातील ठराविक काळात (पृथ्वीच्या झुकण्यामुळे) आजही ही ठिकाणे सर्वात आधी सूर्यप्रकाश पडतो.

5 / 5
जपान - 'उगवत्या सूर्याचा देश': ऐतिहासिक आणि पारंपरिकदृष्ट्या जपानला 'उगवत्या सूर्याचा देश' म्हटले जाते. मात्र, भौगोलिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिले तर किरिबाती आणि न्युझीलंड हा देशांमध्ये जपानच्याही आधी सूर्योदय होतो.