
भारत : भारतात सुमारे 38% ते 42% लोकसंख्या शाकाहारी आहे. शाकाहाराच्या बाबतीत भारत जगात अव्वल स्थानी असून येथील जैन, हिंदू आणि बौद्ध धर्मातील अहिंसेच्या तत्त्वामुळे शाकाहाराचे प्रमाण सर्वाधिक आहे.

मेक्सिको : मेक्सिकोमध्ये साधारण 19% लोक शाकाहारी आहेत. अलीकडच्या काळात तिथे आरोग्य आणि प्राण्यांच्या अधिकारांबाबत जागरूकता वाढल्याने शाकाहाराकडे लोकांचा कल वाढला आहे.

ब्राझील : मांसाहारासाठी प्रसिद्ध असलेल्या ब्राझीलमध्येही आता बदल होत असून सुमारे 14% लोकसंख्या शाकाहारी आहे. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये हा ट्रेंड जास्त दिसून येतो.

इस्रायल : इस्रायलमध्ये सुमारे 13% लोक शाकाहारी आहेत. येथील 'कोशेर' आहाराचे नियम आणि 'व्हेगन'चळवळ खूप प्रभावी आहे. तेल अवीव हे शहर जगाची 'व्हेगन राजधानी' म्हणूनही ओळखले जाते.

तैवान : तैवानमध्ये साधारण 12% ते 13% लोक शाकाहारी आहेत. येथील बौद्ध धर्माचा प्रभाव आणि कडक अन्न-लेबल्सच्या कायद्यांमुळे शाकाहारी लोकांची संख्या जास्त आहे.